Nagpur MLC Election Result 2026 sarkarnama
विदर्भ

Nagpur MLC Election Result Update 2026: नागपूर पदवीधरमध्ये ट्विस्टवर ट्विस्ट, तब्बल 32 हजार 324 मते बाद होणार! वंजारी-कोहळेंमध्ये काटे की टक्कर

Sudhakar Kohale vs Abhijit Vanjari: Nagpur MLC Election Result latest updates : नागपूर पदवीधरमध्ये वंजार-कोहळेंमध्ये काटे की टक्कर दिसत आहे. कोहळेंकडे चार हजार मतांची आघाडी आहे, मात्र, दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतांवर विजयी उमेदवार ठरणार आहे.

सरकारनामा ब्यूरो

Nagpur News : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतमोजणीच्या दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतांना निर्णायक महत्त्व प्राप्त होणार आहे. निवडणुकीतील कोटा पूर्ण करण्यासाठी सुधाकर कोहळे आणि अभिजित वंजारी यांना अनुक्रमे १४ हजार ५१४ आणि १८ हजार ८०८ मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे बाद होणाऱ्या उमेदवारांच्या मतपत्रिकांवरील दुसऱ्या पसंतीक्रमाची मते कोणाच्या पारड्यात पडतात, यावर निकालाचे गणित अवलंबून असेल.

या निवडणुकीत आतापर्यंत १५ हजार ३२ मते अवैध ठरली आहेत. विजयी होण्यासाठी ७५ हजार ४३८ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर उर्वरित मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कराळे मास्तर यांना मिळालेली २४ हजार २४९ मते बाद होणाऱ्या मतांमध्ये समाविष्ट होतील. याशिवाय अन्य ३५ उमेदवारांची ७ हजार ९७५ मते बाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूण ३२ हजार ३२४ मतपत्रिकांवरील दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतांचे हस्तांतरण होण्याची शक्यता आहे.

कोण विजयी होणार?

या प्रक्रियेत संबंधित मतपत्रिकांवर दुसऱ्या पसंतीक्रमासाठी नोंदविलेली मते नियमानुसार पात्र उमेदवारांच्या खात्यात जमा केली जातील. त्यातून कोटा पूर्ण करणाऱ्या उमेदवाराला विजयाची संधी मिळेल. कोटा पूर्ण करण्यासाठी आवश्यक मतांची संख्या आणि दुसऱ्या पसंतीक्रमातून मिळणारा पाठिंबा यामुळे निवडणुकीची उत्कंठा वाढली आहे. त्यामुळे मतमोजणीच्या अंतिम टप्प्यात कोण सर्वप्रथम निर्धारित कोटा पूर्ण करतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT