Nitin Gadkari and Vikas Thakre Sarkarnama
विदर्भ

Nagpur Lok Sabha Election : गडकरी विकास घेऊन जनतेपुढे जाताहेत, तर ‘विकास’ म्हणतोय शहर भकास केले !

Vikas Thakre : विकास ठाकरे यांना काँग्रेसने मैदानात उतरवले आहे. ठाकरे शहराचे महापौर होते. सध्या ते आमदार आहेत आणि शहराचे काँग्रेसचे अध्यक्ष या नात्याने काँग्रेसची कमान त्यांच्या हातात आहे.

सरकारनामा ब्यूरो

Nagpur Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीत नागपुरातील लढतीकडे साऱ्या देशाचे लक्ष लागलेले आहे. कारण येथून रोडकरी, पुलकरी म्हणून ओळखले जाणारे नितीन गडकरी निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसने युवा नेते, नागपूरचे माजी महापौर आमदार विकास ठाकरे यांना मैदानात उरवले आहे. गडकरी शहराचा केलेला विकास घेऊन मतदारांपुढे जात आहेत, तर अशा विकासाची शहराला गरज नाही, असे म्हणत विकास ठाकरे भाजपवर टीका करत आहेत. विकासाच्या नावाखाली पैशांची उधळपट्टी आणि शहर भकास केल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दहा वर्षांच्या कार्यकाळात केलेला नागपूर शहराचा विकास आणि त्यांच्या विरुद्ध लढत असलेले ज्यांच्या नावातच विकास आहे, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांच्यात या वेळी नागपूर लोकसभा मतदारसंघात थेट लढत होत आहे. त्यामुळे गडकरींच्या ‘विकासा’विरुद्ध काँग्रेसचा ‘विकास’ असा सामना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बघायला मिळणार आहे.

गडकरी यांची लोकप्रियता अफाट आहे. रस्ते आणि उड्डाणपुलांच्या बांधणीतून त्यांनी शहराचे रूपडं पालटलं आहे. हे त्यांचे विरोधकही खासगीत मान्य करतात. गडकरींनी पाच वर्षे विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धांची मेजवानी दिली. गडकरींचा खासदार सांस्कृतिक महोत्सव आणि खासदार क्रीडा महोत्सवाने या दोन्ही क्षेत्रांतला शहराचा अनुशेष भरून काढला. त्यांच्या ‘ॲग्रोव्हिजन' प्रदर्शनाने देशपातळीवर नागपूरचे नाव झळकले आहे. राज्यभरातील शेतकरी या प्रदर्शनाकडे लक्ष ठेवून असतो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

‘ॲग्रोव्हिजन’मध्ये मळणी यंत्रापासूनच आधुनिक ट्रॅक्टरपर्यंत सर्व उपकरणे, शेती अवजारे येथे बघायला मिळतात. उसापासून ते कापसाच्या बोंडाच्या उत्पादनापर्यंत जगात झालेले बदल, विविध प्रयोगांची, शेतकऱ्यांची यशोगाथेची माहिती येथे शेतकऱ्यांना मिळते. दुसरीकडे दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांचीही काळजी ते घेत आले आहेत. गोरगरीब दिव्यांग आणि ज्येष्ठांना काठी वाटपापासून आवश्यक ते साहित्य ते पुरवत असतात. या गडकरी यांच्या जमेच्या बाजू आहेत. गल्लोगल्ली भाजप कार्यकर्त्यांची फळी आहे. ही गडकरी यांच्यासाठी जमेची बाजू आहे.

भाजपच्या वतीने शहराचा झालेला विकास आणि गडकरींची लोकप्रियता क्रॅश केली जात आहे. स्वतः गडकरी मोठ्या सभा टाळून ‘वन टू वन' समाजातील विविध घटक, संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींसोबत वैयक्तिक संवाद साधत आहेत. जाहीरनाम्याच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी काय हवे, याचे आवाहन त्यांनी केले आहे. काँग्रेसचा गडकरींच्या विकासावर आक्षेप आहे. गरज नसताना शहरात सिमेंट रोड व उड्डाणपूल बांधले जात असल्याचा त्यांचा आरोप आहे. रस्ते उंच केल्याने पावसाळ्याचे पाणी घरांमध्ये शिरत आहे. काँक्रीट रस्त्यांमुळे शहराच्या तापमानात वाढ झाली आहे. विकासाच्या नावावर मनमानी कारभार आणि पैशाची उधळपट्टी सुरू असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.

Edited By : Atul Mehere

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT