Nagpur Political News : लोकसभेच्या निवडणुकीत संविधानाच्या मुद्यावरून महायुतीविरोधात वातावरण झाले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी कुणीही आले तरी संविधान बदलू शकत नाही, असे वारंवार सांगितले. मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही आणि महायुतीला सपाटून मार खावा लागाला.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 4 पैकी फक्त एकच जागा मिळाली. आता हे लक्षात घेऊन अजित पवार यांचा वाढदिवसानिमित्त नागपूरमध्ये संविधानाचा जागर करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आणि शहर अध्यक्ष प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात सोमवारी दीक्षाभूमी येथे संविधानाचा जागर केला जाणार आहे. सोबतच भंते यांना चिवर वाढदिवसाची भेट म्हणून दिले जाणार आहे. अजित पवार Ajit Pawar यांच्या वाढदिवासाची जोरात तयारी शहर राष्ट्रवादीच्यावतीने केली जात आहे. दादांचा गुलाबी कपड्यातील नवा लूकसुद्धा शुभेच्छा फलकांवर झळकणार आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत विदर्भात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने NCP एकही उमेदवार दिला नव्हता. दुसरीकडे शरद पवार यांनी वर्धा लोकसभेची जागा आग्रहाने मागून घेतली होती. अमर काळे यांना उमेदवारी देऊन त्यांना निवडून आले आहेत.
मागील विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आमदार विदर्भातून निवडूण आले होते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा अपवाद वगळता आता सर्व अजितदादा यांच्या राष्ट्रवादीत गेले आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरीचे आमदार धर्मराव बाबा आत्राम हे राज्यात मंत्री आहेत. राष्ट्रवादीच्यावतीने नागपूर जिल्ह्यातील ग्रामीणमधील दोन आणि शहरातील दोन विधानसभा मतदारसंघ देण्याची मागणी केली आहे.
भाजपसोबत युती असल्याने शहरात विधानसभेसाठी मतदारसंघ सोडला जाईल, की नाही याची शंका आहे. असे असले तरी विधानसभेच्या निवडणुकीस संविधान बदलणार याचा फटका बसू नये याची काळजी आतापासूनच घेतली जात आहे.
अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त नागपुरात दीक्षाभूमी येथून काढण्यात येणाऱ्या संविधान जागर कार्यक्रमाच्या माध्यमातून संविधानच्या संरक्षणाची हमी दिली जाणार असल्याचे कळते. मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये, यासाठी समता आणि शांतीचा संदेश दिला जाणार आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.