NCP's Agitation in Nagpur : गेल्या काही दिवसांपासून शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेस चांगलीच सक्रिय झाली आहे. एरवी शांत दिसत असलेले नेते निवडणुकांची चाहूल लागताच ॲक्शन मोडवर आले आहेत. एका पाठोपाठ एक आंदोलनांचा सपाटा राष्ट्रवादीतर्फे लावण्यात आला आहे. (The leaders got into action mode as soon as the elections loomed)
परवा परवा महापुरुषांचे पुतळे हटवल्याच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक होऊन रस्त्यावर उतरली होती. त्यानंतर कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ आंदोलन केले आणि आज पुन्हा रस्त्यावर येत महावितरणच्या विरोधात शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. महावितरणच्या विरोधात घोषणाबाजी करत कार्यकर्ते आजही आक्रमक झालेले पाहायला मिळाले.
वारंवार वीज पुरवठा खंडित करणाऱ्या आणि ग्राहकांच्या तक्रारी घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या महावितरणच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना तक्रारींचे निवेदन देऊन जो पर्यंत प्रश्न सुटत नाही, तोवर आंदोलन करण्याचा इशारा शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी दिला आहे.
नागपूर (Nagpur) शहर राष्ट्रवादीच्यावतीने (NCP) आज (ता. २) पेठे यांच्या नेतृत्वात अभियंत्यांची भेट घेण्यात आली. वारंवार विद्युत प्रवाह खंडित होत आहे, संबंधित पॉवर हाउसमध्ये कुणी टेलिफोन कोणी उचलत नाही. कर्मचारी आणि दुरुस्ती वाहन उपलब्ध नसल्याचे सांगून तीन-चार तास कर्मचारी दुरुस्तीसाठी येत नाहीत. बऱ्याच परिसरांत विद्युत पुरवठ्याची मागणी वाढली असल्यामुळे व्होल्टेज अपुरे असते.
विद्युत पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त असल्यामुळे आणि पुरेसे व्होल्टेज असल्यामुळे टीव्ही, फ्रिज, एसी, कुलर आदी उपकरणे काम करत नाहीत. हाय आणि लो व्होल्टेज असल्यामुळे घरगुती इलेक्ट्रिक उपकरणांमध्ये बिघाड येत आहेत. एखाद्या परिसराच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड आल्यावर दुसरे ट्रान्सफॉर्मर यायला उशीर होतो. त्यामुळे जनता त्रस्त झाली आहे. बऱ्याच ठिकाणी विद्युत पुरवठ्यांची मागणी वाढलेली आहे. हे लक्षात घेऊन ट्रान्सफॉर्मर वाढवण्याची मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली.
१ एप्रिलपासून १५ टक्के प्रमाणे वीज दरात वाढ करण्यात आली. त्यात जनतेची फसवणूक होत आहे. ही दर वाढ रद्द करावी आणि कायमस्वरूपी खंडित झालेल्या वीज ग्राहकांसाठी जुनी विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) व्याज माफी योजना सुरू करावी. ही मागणी राष्ट्रवादीने लाऊन धरली आहे.
मागणी पूर्ण न झाल्या उग्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. आंदोलनात शेखर सावरबांधे, रमण ठवकर,अफजल फारुकी, नूतन रेवतकर,शिव बेंडे, महेंद्र भांगे, रिजवान अंसारी, चिंटू महाराज,राजा बेग, अश्विन जवेरी, देवेंद्र घरडे,हाजी सोहेल पटेल, तनुज चौबे, प्रशांत बनकर, विनय मुदलीयार, वसीम लाला, डॉ. मिलिंद वाचनेकर आदी सहभागी झाले होते.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.