Dr Ashish Deshmukh, Dr. Babanrao Taywade, Atul Londhe, Subhash Ghate and others Sarkarnama
विदर्भ

Nagpur OBC Movement : भाजप नेते म्हणतात, आरक्षण आंदोलन हे पक्षाचे नव्हे समाजाचे व्यासपीठ !

Dr. Ashish Deshmukh : कोणत्याही पक्षापेक्षा समाजाचे हित जास्त महत्वाचे आहे.

Atul Mehere

Nagpur Political News : ओबीसी प्रवर्गातून अन्य कोणत्याही समाजाला आरक्षणातील वाटा देण्यात येऊ नये, या मागण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने नागपुरात गेल्या १२ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्काही लागणार नाही, असे आश्‍वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतरही दुसऱ्याच दिवशी या आंदोलनात भाजपचे काही नेतेही सहभागी झाले. (The interest of society is more important than any party)

भाजप नेते आंदोलनात सहभागी झाल्यामुळे या नेत्यांचा आपल्याच पक्षावर आणि नेत्यांवर विश्वास नाही का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. भाजपचे नेते डॉ. आशिष देशमुख यांनी यासंदर्भात आज ‘सरकारनामा’शी बोलताना स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आंदोलनाचे व्यासपीठ हे राजकीय नाही तर ओबीसी समाजाचे आहे. कोणत्याही पक्षापेक्षा समाजाचे हित जास्त महत्वाचे असल्याने विविध राजकीय पक्षांतील नेते पक्षीय राजकारण बाजूला ठेवत आंदोलनात सहभागी झाले आहेत.

सरकाराकडून ओबीसी समाजाच्या हितासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. ओबीसी प्रवर्गात कुणालाही आरक्षणाचा वाटा मिळणार नाही, असे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. आपण ओबीसी समाजातील नेत्यांना विनंती करतो की, त्यांनी आंदोलन मागे घ्यावे, असेही डॉ. देशमुख म्हणाले. ओबीसी प्रवर्गातील प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी सरकारच्या स्तरावर बैठक घेण्याचा प्रस्ताव आहे. या बैठकीत वेगवेगळ्या विषयांवर नक्कीच तोडगा निघेल.

सरकारवर अविश्वास दाखविणे ही कुणाचीही भावना नाही. समाजाचे प्रश्न निकाली निघणे महत्वाचे आहे. सरकारने आतापर्यंत कोणत्याही समाजाकडे दुर्लक्ष केलेले नाही. मराठा समाजाच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: गेले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओबीसी समाजाच्या आंदोलनस्थळी आलेत. धनगर समाजाबद्दलही शासन गंभीर आहे. त्यामुळे आंदोलन करण्यापेक्षा सरकारशी चर्चा करून सर्वांनी तोडगा काढावा, असे आवाहन डॉ. देशमुख यांनी केले.

नागपुरात सुरू असलेल्या ओबीसी समाजाच्या आंदोलनस्थळाला भेट देत डॉ. देशमुख यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. बबनराव तायवाडे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. संविधान चौकात सुरू असलेले आंदोलन मागे घेण्याची विनंतीही त्यांनी यावेळी डॉ. तायवाडे यांना केली. मराठा आणि ओबीसी समाजात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन सुरू आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारची तारेवरची कसरतही सुरू आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT