Amitesh Kumar Sarkarnama
विदर्भ

Nagpur Police : अकोल्यातील दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांची सोशल मीडियावर करडी नजर !

Amitesh Kumar : तत्काळ कठोर कारवाईचे निर्देश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Police keep a close eye on social media activity : अकोला जिल्ह्यात दोन गटातील हाणामारीचे दंगलीत रूपांतर झाल्याने नागपूर शहर पोलिसांनी खबरदारी म्हणून शहरात ‘हाय अलर्ट’ दिला आहे. त्यानुसार शहरातील सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील संवेदनशील ठिकाणी सशस्त्र पोलिसांची गस्त आणि शांतता बिघडविणाऱ्यांवर तत्काळ कठोर कारवाईचे निर्देश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. (Appealed to maintain law and order)

आज (ता. १५) पत्रकारांशी बोलताना अमितेशकुमार म्हणाले, शहरभर कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे आणि विशेष करून सोशल मीडियातील हालचालींवर आमचे बारीक लक्ष आहे. कुणी कशीही पोस्ट केली, तरी लवकरात लवकर आमच्या नजरेत कशी येईल, यासाठी आमचा विभाग सतर्क आहे. ‘द केरला स्टोरी’ हा सिनेमा ज्या चित्रपटगृहांमध्ये सुरू आहे, त्या परिसरांमध्येही बंदोबस्त (Police Action) लावण्यात आला आहे.

पोलिस आयुक्त (Police Commissioner) अमितेश कुमार यांनी अकोल्यातील दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर उपराजधानीतील कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी शहरातील सर्व पोलिस यंत्रणेला सज्जतेचा इशारा देत शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन केले. शहरातील प्रत्येक घडामोडीची माहिती मिळावी यासाठी विशेष शाखा व स्थानिक पोलिस स्टेशनच्या डीबी पथकाला अधिक सतर्क राहण्यासही सांगण्यात आले आहे.

याशिवाय शहरातील संवेदनशील ठिकाणी पोलिसांनी गस्त वाढविण्यात आली आहे. याशिवाय स्थानिक पोलिसांनी शांतता समितीची बैठक घेऊन जातीय सलोखा कायम राहावा, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन समितीतील विविध धर्मांच्या सदस्यांना केले. दरम्यान, नागपूर ग्रामीण पोलिस दलाचे अधीक्षक विशाल आनंद यांनीही अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना देत गस्त वाढविण्याचे निर्देश दिले आहेत.

गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष..

पोलिस (Police) आयुक्तांनी शहरातील (Nagpur) झोपडपट्टीसह मुस्लीमबहुल तहसील, लकडगंज, कोतवाली, गणेशपेठ, यशोधरानगर, कामठी पाचपावली, गिट्टीखदान, मानकापूर, सक्करदरा नंदनवन व हुडकेश्वर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील संवेदनशील ठिकाणांच्या स्थितीवर संबंधित पोलिस उपायुक्त, साहाय्यक पोलिस आयुक्त व वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी करडी नजर ठेवण्यासह या भागातील गुन्हेगारांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्याचे निर्देशही अमितेशकुमार यांनी दिले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT