BSP Vs Azad Samaj Party Sarkarnama
विदर्भ

BSP Vs Azad Samaj Party: BSPच्या हत्तीसमोर आझाद समाज पार्टीचे आव्हान; महापालिका निवडणूक रंगणार

Local Body Elections 2025 Nagpur Municipal Polls: बसपाने दुखावलेल्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी महाराष्‍ट्रात आता आपले पाळेमुळे घट्ट करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आझाद पार्टीचा सर्वाधिक धोका बसपालाच बसण्याची शक्यता आहे.

Rajesh Charpe

Nagpur News: बसपाला पर्याय म्हणून निर्माण झालेली आझाद समाज पार्टीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपले खाते उघडण्याचा संकल्प केला आहे. यासाठी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत समविचारी पक्षांसोबत मोट बांधण्यात येणार असल्याचा सांगून पक्षाने सर्वांसाठी दारे उघडी असल्याचा संदेश पाठवला आहे. हे बघता नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत आणखी एका पक्षाची व आघाडीची भर पडणार आहे.

नागपूरमध्ये भाजप आणि काँग्रेस अशी थेट लढत होते. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला इतक्या वर्षांत अद्यापही आपली ताकद उभी करता आली नाही. मागील महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा फक्त एक नगरसेवक निवडून आला होता. राज्यात सत्ता नसतानाही बसपाने ठशीव कामगिरी केली. त्यांचे एकूण १२ नगरसेवक निवडून आले होते.

मात्र आता बसपातही फाटाफूट झाली आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीतनंतर बसपाने अनेक पदाधिकाऱ्यांना निलंबित आणि निष्काषित केले. बसपातून केव्हा कोणाची कधी पक्षातून हकालपट्टी केली जाईल याची शाश्वती नसते. त्यामुळे कॅडर दुखावत चालले आहे.

पक्षाच्या धरसोड धोरणामुळे अनेकांनी कांशीराम यांच्या विचारातून स्थापन झालेल्या आझाद समाज पार्टीचा पर्याय आता निवडला आहे. खासदार चंद्रशेखर आझाद पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. बसपाने दुखावलेल्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी महाराष्‍ट्रात आता आपले पाळेमुळे घट्ट करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. बसपाचे कॅडरलाही जोडण्याचा प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आझाद पार्टीचा सर्वाधिक धोका बसपालाच बसण्याची शक्यता आहे.

बसपा आणि वंचित आघाडीला वगळून इतर छोट्या मोठ्या समविचारी पक्षांना सोबत घेऊन आझाद पार्टीने महापालिकेत पाऊल टाकण्याचा प्रयत्न चालवले आहेत.आझाद पार्टीच्या पूर्व विदर्भातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक नागपूरमध्ये घेण्यात आली. या बैठकीला महाराष्ट्राचे प्रभारी रूपेश बागेश्वर, प्रदेश उपाध्यक्ष रुपचंद टोपले, महासचिव जे.बी. रामटेके, सचिव दिगम्बर पलटनकर, पूर्व विदर्भाचे अध्यक्ष नितीन नागदेवते, उपाध्यक्ष अशोक वाघमारे, नागपूरचे जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, शहर अध्यक्ष पियुष घुले यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

आझाद समाज पार्टीने विधानसभेच्या निवडणुकीत काही उमेदवार उभे केले होते. अमरावती विधानसभा मतदारसंघात आझाद पार्टीचे उमेदवार अलीम पटेल यांनी काँग्रेसचे उमेदवार, माजी सुनील देशमुख यांच्या बरोबरीत सुमारे ५४ हजार मते घेतली होती. त्यामुळे आझाद पार्टीच्या अपेक्षा वाढल्या आहेत. विदर्भात खाते उघडण्याची हीच संधी असल्याचे बघून स्थानिक निवडणुकीत मोठ्या प्रमाणात जुळवाजुळव सुरू केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT