Congress  Sarkarnama
विदर्भ

Nagpur Congress: नागपूर पूर्व, दक्षिणचा तिढा कायम, काँग्रेस नेत्यांची पुन्हा दिल्लीवारी

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी येथून लढण्यात इच्छुक आहेत. संगीता तलमले यांनाही पक्षाने तयारी करण्यास सांगून ठेवले होते. काँग्रेसची तयारी सुरू असताना हा मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी सोडण्यात आल्याने काँग्रेसला धक्का बसला आहे.

Rajesh Charpe

Nagpur News: विधानसभा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त चारच दिवस शिल्लक आहेत. मात्र अद्यापही नागपूर शहरातील पूर्व आणि दक्षिण नागपूरचा तिढा सुटलेला नाही. पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिल्याने काँग्रेसमध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे.

पूर्व नागपूर पुन्हा आपल्याकडे खेचून आणण्यासाठी शहरातील काँग्रेस नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. सध्या छाननी समितीची बैठक सुरू असून रात्रीपर्यंत उमेदवार जाहीर होतील असे दिल्लीत असलेल्या काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले.

पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा आहे.माजी मंत्री व काँग्रेसचे नेते सतीश चतुर्वेदी यांनी तब्बल चार वेळा या मतदारसंघातून निवडून आले होते. सध्या या मतदारसंघात भाजपचे कृष्णा खोपडे आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच नगरसेवक आहे. असे असताना हा मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी सोडणे काँग्रेसला पचले नाही. येथ बंडखोरीसुद्धा होण्याची शक्यता आहे.

पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी येथून लढण्यात इच्छुक आहेत. संगीता तलमले यांनाही पक्षाने तयारी करण्यास सांगून ठेवले होते. काँग्रेसची तयारी सुरू असताना हा मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी सोडण्यात आल्याने काँग्रेसला धक्का बसला आहे. दक्षिण नागपूर भांडूण उद्धव सेनेकडून घेण्यात काँग्रेसला यश आले आहे.

येथे गिरीश पांडव यांचे नाव आघाडीवर आहे. मागील निवडणुकीत ते अवघ्या चार हजार मतांनी पराभूत झाले होते. याच मतदारसंघातून काँग्रेसच्या मीडिया सेलचे प्रदेश अध्यक्ष विशाल मुत्तेमवार आणि काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे हेसुद्धा प्रयत्न करीत आहेत.

सध्या या दोन्ही जागांवरून दिल्लीत घमासान सुरू आहे. काँग्रेसच्या नेत्यांना पूर्व नागपूर परत मिळेल अशी आशा वाटत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सचिव तसेच राज्य महिला आयोगाच्या सदस्य आभा पांडे यांनी येथून बंडाचे निशान फडकावले आहे. राष्ट्रवादीकडे हा मतदारसंघ कायम राहिल्यास काँग्रेसमधून बंडखोरी होण्याची शक्यता विर्तविली जात आहे.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT