Sameer Meghe, Dr. Ashish Deshmukh and Sunil Kedar Sarkarnama
विदर्भ

Nagpur Politics News : डॉ. देशमुखांची सावनेरातून तयारी, तर मेघेंच्या बालेकिल्ल्यातून लढण्याचा केदारांना आग्रह !

Dr. Ashish Deshmukh : डॉ. आशिष देशमुख यांनी केदारांच्या सावनेरमधून लढण्याची तयारी चालवली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Nagpur District's Hingna and Saoner politics News : पुढील वर्षी लोकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. पण दोन्ही निवडणुका एकत्र होऊ शकतात, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. उमेदवारांनी निवडणुकीच्या तयारीत स्वतःला झोकून दिले आहे. आमदार सुनील केदार हे सावनेर विधानसभा मतदारसंघातील अनभिषीक्त सम्राट मानले जातात. तेथे त्यांच्याशी लढणे वाटते तितके सोपे नाही. (But both the elections can be combined)

काटोलचे माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केदारांच्या सावनेरमधून लढण्याची तयारी चालवली आहे. त्यांचे वडील माजी मंत्री रणजीत देशमुख हे सावनेरमधून पूर्वी आमदार राहलेले आहेत. आता डॉ. आशिष तेथून लढण्यास इच्छुक असल्याच्या हालचाली दिसत आहेत. दरम्यान सुनील केदार यांनी भाजपचे आमदार समीर मेघे यांचा बालेकिल्ला हींगण्यातून लढावे, अशी गळ केदारांच्या खंद्या समर्थक जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष कुंदा राऊत यांनी घातली आहे.

काँग्रेसचे सावनेर विधानसभा क्षेत्रातील आमदार सुनील केदार यांनी हिंगणा विधानसभा क्षेत्रात लढावे, असे आवाहन चक्क नागपूर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा कुंदा राऊत यांनी ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ या अभियानांतर्गत हिंगणा येथील रेणुका सभागृहात आयोजित आढावा सभेत केले. यावेळी सभागृहात प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला.

एकीकडे सावनेर येथील सुनील केदार (Sunil Kedar) यांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचे (Cogress) निष्कासित माजी आमदार डॉ.आशिष देशमुख (Dr. Ashish Deshmukh) भाजपकडून लढण्याच्या तयारीत असताना चक्क केदारांच्या कट्टर समर्थक व नागपूर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांनी हे आवाहन केल्यामुळे क्षेत्रात उलटसुलट चर्चांला उधाण आले आहे.

आमदार समीर मेघे हे हिंगणा विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा निवडून आले असून दिवसेंदिवस भाजपमध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मागील निवडणुकीत त्यांनी १ लाख २१ हजार ३०५ एवढी मते घेऊन ते विजयी झाले होते. परंतु विजयानंतर त्यांच्यावर बोगस मतदारांचा भरणा केल्याचा आरोप सुद्धा करण्यात आला होता.

हिंगण्यात झालेल्या कार्यक्रमाला नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोकड्डे,आमदार सुनील केदार,माजी आमदार रमेशचंद्र बंग,जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सौम्या शर्मा,माजी जि.प.अध्यक्षा रश्मी बर्वे ,उपाध्यक्षा कुंदा राऊत,महिला व बालकल्याण सभापती अवंतिका लेकुरवाळे,माजी सभापती उज्वला बोढारे,समाजकल्याण सभापती मिलिंद सुटे,कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळू जोध,शिक्षण व अर्थ समिती सभापती राजकुमार कुसंबे,जि.प.सदस्य दिनेश बंग,रश्मी कोटगुले ,संजय जगताप ,पंचायत समिती सभापती सुषमा कावळे,उपसभापती उमेशसिंह राजपूत,सदस्य सुनील बोंदाडे ,रूपाली खाडे तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT