Prashant Koratkar  Sarkarnama
विदर्भ

Prashant Koratkar : पोलिसांनी कारवाईचा फास आवळताच कोरटकर नरमला, आता म्हणतो...

Prashant Koratkar Nagpur controversial remarks Chhatrapati Shivaji Maharaj threatening Indrajit Sawant : कोल्हापूर इंद्रजीत सावंत यांना धमकी देताना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नागपूरचा प्रशांत कोरटकर याने व्हिडिओ पोस्ट केला आहे.

Pradeep Pendhare

Nagpur News Update : नागपूरच्या प्रशांत कोरटकर याने काही दिवसापूर्वी इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना फोन करून धमकी दिली होती. सावंत यांना धमकी देताना कोरटकर याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरले.

सुरवातीला 'तो मी नव्हेच', अशी भूमिका घेणारा, कोरटकरविरुद्ध नागपूर, कोल्हापूर यासह इतरत्र गुन्हे दाखल झाल्यानंतर शहाणपण सुचलं आहे. कोरटकर याने स्पष्टीकरण सांगणारा व्हिडिओ आणि एक पत्रक काढलं आहे.

प्रशांत कोटरकटविरोधात राज्यात संतापाची लाट उसळलेली आहे. यानंतर कोरटकर बेपत्ता झाला. नागपूरमध्ये मराठा (Maratha) समाजाने मोर्चा काढला होता. कोल्हापूर, नागपूरसह राज्यातील इतर भागात देखील त्याच्याविरोधात गुन्हे दाखल झाले. यानंतर बेपत्ता असलेल्या कोरटकर याचे राजकीय संबंध अन् त्याच्याकडची मालमत्ता देखील चर्चेत आली. दाखल गुन्ह्यांमध्ये काही अटी-शर्तीवर त्याला आता जामीन मिळाला आहे.

यानंतर कोरटकर याने एक व्हिडिओ (Video) काढून समाज माध्यमांवर पोस्ट केला आहे. तसेच त्याने एक पत्रक देखील काढले आहे. या पत्रकात 'श्रीमद् भगवद्गीतामधील' श्लोकचा संदर्भ दिला आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज माझे आणि माझ्या कुटुंबियांचे प्रेरणास्त्रोत असल्याचे म्हटले आहे.

कोरटकरने पत्रकात म्हटलंय की?

छत्रपती शिवाजी महाराज माझे प्रेरणास्त्रोत आहेत. महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज हे माझ्यासाठी सदैव वंदनीय, आदरणीय असेच आहेत. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हेही माझे प्रेरणास्त्रोत आहेत. शिवाजी महाराजांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत आणि त्यासाठी मी नम्रतेने त्यांना नमस्कार व वंदन करतो.

'श्रीमद् भगवद्गीतामधील' श्लोक

शिवाजी महाराज एक आध्यात्मिक राजेच होते आणि ते या महाराष्ट्राला लाभले, हे आपले परमभाग्य. भवानी मातेच्या पुत्राने असामान्य धैर्य आणि तलवार गाजवून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली त्याला त्रिवार वंदन. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्। धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥

'छत्रपतीं'चे कौतुक...

निसर्ग आपली अलौकिक माणसं निर्माण करतो, त्यातला एक परमोत्कर्ष बिंदू म्हणजे आपले शिवाजी महाराज होते. पुत्र कसा असावा हे आपण छत्रपती संभाजी महाराजांकडून शिकतो, हे माझे त्यांच्याबद्दलचे स्वाभाविक विचार. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगडावर जाण्याचा मला अनेकदा योग आला आणि त्यानिमित्ताने मी आणि माझ्या संपूर्ण कुटुंबांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना नमन केले आहे. आजच्या प्रसंगी मी छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि जिजाऊ माँ साहेबांना मानाचा मुजरा करतो. जय जिजाऊ.... जय शिवराय ...जय महाराष्ट्र

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT