Nagpur RSS .jpg Sarkarnama
विदर्भ

Nagpur RSS Headquarters: नागपूरमधून धक्कादायक अपडेट समोर,'RSS'च्या कार्यालयाजवळ स्फोटकं आढळली; पोलिसांचा तडकाफडकी मोठा निर्णय

Nagpur Crime News: नागपूर शहरातील सीए रोडवरील दोसर भवन चौक परिसरातील एका घरगुती बागेत एक संशयास्पद बॅग निदर्शनास आली. घरमालकाला मंगळवारी(ता.7 एप्रिल) सकाळी ही बॅग दिसून येताच तातडीनं पोलिसांना याबाबतची माहिती देत बोलावण्यात आले.

Deepak Kulkarni

Nagpur News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं होमग्राऊंड व राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरातून मोठी धक्कादायक घटना उघडकीस येत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुख्यालयापासून काही अंतरावरच असलेल्या सीए रोड परिसरातील एका घरात मोठ्या प्रमाणात स्फोटके सापडल्यानं परिसरासह शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांकडून संपूर्ण नागपूर शहरात ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

नागपूर शहरातील सीए रोडवरील दोसर भवन चौक परिसरातील एका घरगुती बागेत एक संशयास्पद बॅग निदर्शनास आली. घरमालकाला मंगळवारी(ता.7 एप्रिल) सकाळी ही बॅग दिसून येताच तातडीनं पोलिसांना याबाबतची माहिती देत बोलावण्यात आले.

यानंतर नागपूर शहर पोलिसांसह बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि फॉरेन्सिक टीमनेही तातडीनं सीए रोडवरील दोसर भवन चौक परिसरातील घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्याकडून या बॅगेची तपासणी केली असता या बॅगेची तपासणी केली असता त्यात खालील स्फोटके आढळून आली.

यात पोलिसांनी बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि फॉरेन्सिक टीमच्या मदतीनं ही 15 जिलेटिन कांड्या, 50 डेटोनेटर्स, 8 कनेक्टर्स यांची स्फोटके जप्त केली. ही स्फोटके गेल्या दीड महिन्यांपासून या ठिकाणी पडून असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

या घटनेनंतर पोलिसांकडून शहरात हाय अलर्ट जारी करत परिसराच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे स्फोटके सापडलेल्या ठिकाणापासून नागपूर शहरातील दोसर भवन चौक परिसरापासून जामा मशीद अवघ्या 200 मीटर अंतरावर असून पोद्दारेश्वर राम मंदिर 500 मीटर अंतरावर आणि RSS मुख्यालय 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर आहे. यामुळे हा संपूर्ण परिसर अतिसंवेदनशील समजला जातो.

नागपूरचे सह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी स्फोटके सापडल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आपली आम्ही चोहोबाजूंनी या स्फोटकांविषयीचा तपास करत आहोत. ही स्फोटके नेमकी तिथे कुणामार्फत पोहोचली, त्यांचा हेतू काय होता, तिथेच ही स्फोटके का ठेवण्यात आली याचा पोलिसांकडून तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

तसेच सध्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संशयितांभोवतीचा कारवाईचा फास पोलिसांकडून आवळण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. पण ही स्फोटके सापडल्यानं नागपूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT