Nagpur, 26 March 2025: नागपूरमध्ये दंगल कोणी घडवली, ती पूर्वनियोजित होती का असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. या प्रकरणाने आता धार्मिक वळण घेतल्याचे दिसते. मुस्लिमांना टार्गेट केले जात असल्याचाही आरोप केला जात आहे. औरंगेजबाची कबर हटवण्यात यावी, यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंगदल दलाच्यावतीने आंदोलन करण्यात आले होते. येथून वादाला ठिगणी पडली.
या प्रकरणी पोलिसांनाही दोषी धरले जात आहे. आंदोलन करण्याची परवानगी पोलिसांनी दिलीच कशी अशीही विचारणा केली जात आहे. मात्र आंदोलन करण्याची परवानगी गणेशपेठ आणि कोतवाली पोलिस ठाण्यातून मिळाली नव्हती, असा दावा केला जात आहे. सामजिक कार्यकर्ते नासिर खान यांनी नागपूरमध्ये दंगलीची पार्श्वभूमी एका गटाने तयारी केली होती असा आरोप करून पोलिसांच्या परवानगी शिवायच कबरीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते असे सांगितले.
माहितीच्या अधिकारात आम्ही माहिती मागवली असता गणेशपेठ पोलिसांनी आंदोलन स्थळ हे त्यांच्या कार्यकक्षेत येत नसल्याचे उत्तर आम्हाला दिले असल्याचे खान यांनी सांगितले. त्यानंतर कोतवाली पोलिस ठाण्यात माहिती मागितली असता अशी कोणतीही परवानगी बजरंग दल किवा विश्व हिंदू परिषदेला कोतवाली पोलिस ठाण्यातून मिळाली नसल्याचे उत्तर देण्यात आले. याचा अर्थ १७ मार्च रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास जे आंदोलन झाले होते तेच बेकायदा होते. आंदोलना दरम्यान जी हिरवी चादर जाळण्यात आली त्यात कुराणची आयात असल्याने एका गटाच्या भावना दुखावल्या.
काही तरुण मुलांनी हा प्रकार बघून गणेशपेठ पोलिसांकडे धाव घेतली व आंदोलनकर्त्यांना रोखण्याची मागणी केली. मात्र, पोलिसांनी त्यांना ठाण्याच्या आत घेऊन दंडुकेशाही दाखवली,मारहाण केली. त्यामुळे फहीम खान याच्या नेतृत्वात मोठा जमाव गणेशपेठ पोलिस ठाण्यात गेला. हिरवी चादर जाळणाऱ्या आंदोलनकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. तेव्हाच पोलिसांनी त्वरित ॲक्शन घेतली असली तर पुढचा प्रकार घडलाच नसता, असे नासीर खान यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.