Jitendra awahad Sarkarnama
विदर्भ

Assembly Winter Session 2023 : अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच वाद पेटला; राष्ट्रवादीच्या कार्यालयातून आव्हाडांची नेमप्लेट हटवली...

Maharashtra Assembly Winter Session 2023 : आव्हाडांची नेमप्लेट काढल्याने नव्या वादाला तोंड फुटलं...

Mangesh Mahale

Nagpur Assembly Session 2023 : हिवाळी अधिवेशनाला काही वेळातच सुरुवात होणार आहे. अधिवेशनापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये कार्यालयावरून वाद निर्माण झाला आहे. दोन्ही गटाला एकच कार्यालय देण्यात आले आहे. कार्यालयात राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची पाटी होती. ही पाटी काढण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली. शरद पवार गट आणि अजित पवार गट अशा दोन गटांत राष्ट्रवादी विभागली गेली असून, दोन्ही गटांमध्ये आरोप-प्रत्यारोप, शाब्दिक चकमक पाहायला मिळते.

अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड या दोन नेत्यांमध्ये नुकताच वाद झाला. सध्या दोन्ही नेत्यांमध्ये 'ढेरी'वरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशात विधिमंडळ कार्यालयात आव्हाडांच्या नावाची लावलेली पाटी काढल्याने वाद निर्माण झाला आहे.

नागपूर येथे होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटाला एकच कार्यालय मिळाले आहे. येथे नेत्यांच्या नावांच्या पाट्या लावण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यालयात जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार यांचं कार्यालय शेजारी आहे. या दोघांच्याही नावाची पाटी काल (बुधवारी) लागली होती. आज आव्हाडांच्या नावाची पाटी काढण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचा आमचा वेगळा गट आहे, असे पत्र प्रशासनाला मिळालेले नाही, त्यामुळे राष्ट्रवादीला एकच कार्यालय देण्यात आल्याचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT