Winter Session 2023 Sarkarnama
विदर्भ

Winter Session : कांदा निर्यात बंदीवरून विरोधक आक्रमक; गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलन

Onion Export Ban: कांद्याचा वांदा करणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो..

Umesh Bambare-Patil

Nagpur winter session: नागपूर अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आज केंद्राने केलेल्या कांदा निर्यात बंदीवरून विरोधकांनी आक्रमक होत विधान भवनाच्या पायऱ्यांवर गळ्यात कांद्याच्या माळा घालून हल्लाबोल आंदोलन केले. यावेळी केंद्रातील मोदी सरकार, तसेच राज्यातील सरकारचा जोरदार निषेध नोंदवला. आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधकांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, निर्यात बंदी उठवावी अशी मागणी करत आंदोलन केले.

"गद्दार सरकार हाय हाय, खोके सरकार हाय हाय, कांदा निर्णयात बंदी करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या सरकारचा धक्कार असो, मोदी सरकारचा धिक्कार असो, निर्यात बंदी हटवलीच पाहिजे केंद्रतील मोदी सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय..." अशी घोषणाबाजी करण्यात आली. विरोधकांच्या या घोषणांनी विधान भवन परिसर दणाणून गेला.

विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. यावेळी सोयाबीन उत्पादकांना भाव मिळावा, अशी मागणी ही केली. दोन दिवसांच्या सुट्टीनंतर आज अधिवेशन सुरू झाले. आजची सुरवातच विरोधकांनी कांदा निर्यात बंदीवरून आक्रमक होत आंदोलन केले, त्यानंतर सर्व विरोधी नेते सभागृहात गेले.

कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारनं निर्यात बंदी (Onion Export Ban) करण्याचा निर्णय घेतला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) मैदानात उतरले आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा असलेल्या नाशिकमध्ये त्याला तीव्र विरोध होत आहे.

आज (सोमवार) सकाळी चांदवड येथे मुंबई-आग्रा महामार्गावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होत आहे. पवारांच्या उपस्थितीत चांदवडमध्ये रास्तारोको आणि सभा होणार आहे. शरद पवार अनेक दिवसानंतर केंद्र सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात महाविकस आघाडीचे घटक पक्ष शिवसेना (उद्धव ठाकरे), काँगेस देखील सहभागी होणार आहेत.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT