Nagpur Winter session
Nagpur Winter session Sarkarnama
विदर्भ

Nagpur Winter session: चव्हाण PMO कार्यालयाचे मंत्री असताना आरक्षण का मिळाले नाही? जयकुमार गोरे कडाडले

उमेश बांबरे .

Winter session 2023: विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात गेल्या तीन चार दिवसांपासून मराठा आरक्षण विधेयकावर चर्चा सुरू आहे. या मुद्द्यावरून अनेक आमदारांनी सरकारला टोले लागवले आहेत. माण खटावचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी मात्र आक्रमकपणे मुद्दे मांडत आजपर्यत मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री झाले पण आरक्षण मिळालं नाही ही खंत या समाजाला आहे, असे त्यांनी नमूद केले.

आमदार गोरे म्हणाले, "मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही आपल्या सर्वांची इच्छा आहे. पण ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही आमची भूमिका कायम आहे.

मनोज जरांगे पाटलांवर समाज विश्वास ठेवतो पण, आठ आठ टर्म आमदार राहिलेल्या आमदारांवर समाजाचा विश्वास राहिलेला नाही, याला आपणच जबाबदार आहोत. समाज गावात येऊ देत नाही याचा विचार सर्वांनी करावा. मराठा समाजाचे मुख्यमंत्री या महाराष्ट्रात होऊन गेले पण आरक्षण मिळाले नाही ही खंत मराठा समाजाला असून पृथ्वीराज चव्हाण पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री असताना तेव्हा आरक्षण का मिळाले नाही,असा हल्लाबोल आमदार जयकुमार गोरे यांनी सभागृहात केला.

जरांगे यांनी राज्य सरकारला दिलेले अल्टीमेटम संपण्यास दहा दिवस बाकी आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीने जोर धरला आहे. जरांगे पाटलांची पुढची सभा शनिवारी (ता. २३) बीड येथे होणार आहे. बीड सभेच्या तयारीसाठी आज (शुक्रवार) सुर्या लॉन्सवर बैठक होणार आहे. बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आले आहे.

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण द्यावे, या मागणीसाठी जरांगे पाटलांनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंत आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा पुढील दिशा स्पष्ट करु, असा इशारा दिला आहे. जरांगे पाटील यांच्या राज्यभर विविध ठिकाणी सभा होत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT