Nana Patole Sarkarnama
विदर्भ

Nana on Modi Government : `वन नेशन वन इलेक्शन’ला नानांचा विरोध नाही, पण…

अभिजीत घोरमारे

नाना पटोले यांच्या नेतृत्वात गोंदियातून सुरू झालेली संवाद यात्रा काल (ता. १२) रात्री उशिरा भंडारा शहरात पोहोचली. दरम्यान, गांधी चौकात येताच नाना पटोले यांनी जाहीर सभेत सरकारवर पुन्हा तोफ डागली. लोकसभेच्या होणाऱ्या विशेष अधिवेशनावरून नानांनी केंद्र सरकारवर आसूड ओढले. (Nana Patole again fired at the government in a public meeting)

केंद्रातील भाजप सरकार लवकरच ‘वन नेशन वन इलेक्शन’ची घोषणा करणार आहे. याबाबत नाना म्हणाले की, वन नेशन वन इलेक्शन या संकल्पनेला काँग्रेसचा विरोध नाही. जगाच्या पाठीवर सर्व देशांनी निवडणुकीसाठी बॅलेट पेपरचा वापर सुरू केला आहे. ईव्हीएम मशिनवर माझा संशय आहे. तेव्हा सरकारने ईव्हीएमवर निवडणुका न घेता ‘बॅलेट पेपर’वर घ्याव्यात.

सरकारला बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा सल्ला देताना त्यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला. मुंबईतील (Mumbai) ‘बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज’ (BSE ) आणि ‘नॅशनल स्टॉक एक्स्चेंज’ (NSE) सुद्धा गुजरातला (Gujrat) घेऊन जाण्याचा डाव मोदी सरकारचा असल्याचा आरोप नानांनी (Nana Patole) केला. याद्वारे मुंबईला तोडण्याचे मोदी सरकारचे षडयंत्र आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केंद्र सरकारवर केला.

मुंबईला केंद्रशासित प्रदेश बनवण्याच्या मोदींचा डाव...

केंद्र सरकारला लोकसभा अधिवेशनाची भीती वाटू लागली आहे. केंद्र सरकारने नवीन लोकसभा भवनात पाच दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवले आहे. परंतु या विशेष अधिवेशनाचा अजेंडा कोणत्याही खासदाराला कळवला नाही. या अधिवेशनात कदाचित भारताचे तुकडे होऊ शकतात किंवा येणाऱ्या दिवसांत स्वतंत्र विदर्भ राज्य होऊ शकते, पण हे विदर्भाच्या भल्याकरिता नसून मुंबईला केंद्रशासित प्रदेश बनवण्याचा भाजपचा डाव आहे.

विदर्भ राज्य वेगळे करून मुंबईमधील अनेक उद्योग गुजरातमध्ये हलवण्याचा भाजपचा डाव आहे. दुसरीकडे येणाऱ्या दिवसांत लोकसभेच्या बसण्याच्या आसनावरून लोकसभेच्या जागाही भविष्यात वाढू शकतात, असे भाकीत नानांनी केले आहे. त्यामुळे पाच दिवसांत विशेष अधिवेशनात काय होते, त्यावर सामान्य जनतेला विश्‍लेषण करावे लागणार असल्याचेही नाना पटोले म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT