Nana Patole and Devendra - Amruta Fadanvis.
Nana Patole and Devendra - Amruta Fadanvis. Sarkarnama
विदर्भ

Nana Patole : देवेंद्र माझे भाऊ; अमृता आमच्या लहान सूनबाई आहेत, त्यांच्याबद्दल कुणी बोललं तर...

सरकारनामा ब्यूरो

Nagpur Nana Patole News : ज्या बागेश्वर बाबाने तुकाराम महाराजांचा अपमान केला त्याचा एवढा कळवळा भाजपला का आहे? भाजपचे पापाचे भांडे जेव्हा फुटते, तेव्हा ते हिंदू धर्माचा आधार घेतात. भाजप हिंदू धर्माचा ठेकेदार आहे आहे का, असा सवाल कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. (Is BJP a contractor of Hinduism?)

आज नागपुरात बोलताना नाना पटोले म्हणाले, महाराष्ट्राच्या संतांबाबत असं वक्तव्य कोणताही बाबा करत असेल तर त्यांचा कार्यक्रम महाराष्ट्रात होऊ नये. म्हणून मी उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी २४० जागा लढवण्याचे सुतोवाच केले. याबाबत विचारले असता, त्यांच्या पोटात जे आहे, ते ओठावर आले. एकनाथ शिंदेंनी आतातरी हे समजून घ्यावे. एकनाथ शिंदे यांचं भलं व्हावं, ही आमची सदिच्छा आहे, असं ते म्हणाले.

भाजपमध्ये आलं की भ्रष्टाचार संपतो का? भाजपमध्ये कुणी आलं की त्या व्यक्तीला क्लीन चिट मिळते, हे गणित आता सर्वसामान्यांच्या लक्षात आले आहे. सरकार आता आउट सोर्सिंग करायला लागले आहे. बिल्डर आणि मोठ्या कंत्राटदारांना काम दिलं जातं आहे. नोकर भरती केली जाणार आहे. मात्र ही सर्व भरती कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे. तसा जीआर सरकारने काढला आहे.

शासकीय सेवेत ठेकेदाराच्या माध्यमातून टेंडर काढले जातील तर ते कसे काम करतील. ते लोकांसाठी काम करतील का? महाराष्ट्राला बरबाद करण्याचे काम भाजप सरकार करत आहे. गुढी पाडव्याला आनंदाची शिधा मिळणार नाही, हे पटोलेंनी खात्रीने सांगितले. ‘जुनी पेन्शन’बाबत विचारले असता, हा संप कॉंग्रेसनेच करायला लावला असा आरोप केला जात आहे. मात्र २००५ मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात भाजपनेच पेंशन बंद केल्याचे पटोले म्हणाले.

भाजप सरकारच्या काळात कुठे गेला महाराष्ट्र अशी विचारायची वेळ आली आहे. ८० टक्के शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या, अशा बातम्या मी माध्यमांमध्ये बघत आहो. सरकारला भीती वाटली असेल म्हणून नवले यांचं नाव समितीमध्ये घेतलं नाही, असे सांगताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) माझे मित्र आहे, ते माझ्या कानात बोलले तेही तुम्हाला सांगायचं का, असा प्रश्‍न नानांनी केला.

देवेंद्र माझे भाऊ आहेत आणि अमृता (Amruta Fadanvis) आमची लहान सूनबाई आहे. त्यामुळं त्यांच्यावर कोणी आक्षेपार्ह बोलत असेल तर त्याचं समर्थन करण्याचं कारण नाही, मात्र, राज्याच्या गृहमंत्र्यांचे घर सुरक्षित नसेल, तर ही चिंतेची बाब आहे, असेही नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT