Nana Patole Sarkarnama
विदर्भ

Nana Patole : नाना पटोलेंनी बैलगाडीतून जात दाखल केला उमेदवारी अर्ज ; म्हणाले, 'ही तर..'

Nana Patole Submits Nomination by Arriving in a Bullock Cart: 'आमचे सरकार आल्यावर सर्वप्रथम...' असंही नाना पटोलेंनी सांगितलं आहे.

Mayur Ratnaparkhe

Sakoli Assembly Constituency 2024 : महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक होणार असून, २३ नोव्हेंब रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. तर प्रत्येक पक्षाचे उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे उमेदवारी दाखल करण्यासाठी नाना पटोले बैलगाडीतून वाजतगाजत गेले होते.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मीडियाशी बोलताना नाना पटोले (Nana Patole) म्हणाले की, तुम्ही या ठिकाणी लोकांमधील उत्साह बघू शकतात. यंदा महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन निश्चित आहे. आम्ही सत्तेत येताच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू. महिला सुरक्षेस आमचे प्राधान्य आहे. तरुणांना रोजगार देणे आणि महागाई कमी करणे आमचे कर्तव्य आहे.

याचबरोबर सोशल मीडिया साईटवर पोस्ट लिहिले की, ही विजयाची सुरूवात आहे. महाराष्ट्र विधानसभेवर महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) झेंडा फडकवला जाईल. तर साकोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल करण्याआधी आयोजित भव्य रॅलीत मोठ्यासंख्ये काँग्रेस, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांचा समावेश होता.

तसेच नाना पटोलेंनी असंही सांगितलं की, मी आणि महाविकास आघाडी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकर यांचा वारसा कायम सुरक्षित ठेवण्यास आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी कटीबद्ध आहे.नाना पटोले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बैलगैाडीतू गेले. यावेळ त्यांच्यासोबत मोठप्रमाणात जनसमुदाय होता.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT