Nana Patole Sarkarnama
विदर्भ

Nana Patole News : ईडी आणि सीबीआय हे दोन बंदर अन् केंद्र सरकार मदारी !

BJP : भाजपने दुसऱ्यांची घरे फोडून आपले घर सजवू नये.

मनोज भिवगडे

I have left BJP's MP post : मी भाजपची खासदारकी सोडून आलो आहे. ते लोक कसे आहेत, याची मला पूर्ण कल्पना आहे. भाजप हा लोकशाही विरोधातील पक्ष असल्याचा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज अकोला येथे केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेबाबत त्यांनी थेट बोलण्याचे टाळले. (I fully understand how those people are)

भाजपने दुसऱ्यांची घरे फोडून आपले घर सजवू नये, असा सल्लाही नाना पटोले यांनी दिला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने सध्या महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. याबाबत अकोल्यातील एका कार्यक्रमासाठी आलेले नाना पटोले यांना विचारले असता त्यांनी दुसऱ्यांच्या घरात काय चाललं आहे, हे डोकावून पाहण्याच काम काँग्रेस कधी करत नसल्याचे सांगितले.

भाजपनेही दुसऱ्यांची घर फोडून स्वतःचे घर सजवू नये, असा सल्ला त्यांनी दिला. भाजपबद्दल नागरिकांमध्ये पूर्वीसारखी सहानुभूती राहिलेली नाही. अकोल्यात देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या उमेदवारास पदवीधरांनी पराभूत केले. त्यामुळे भाजपबद्दल नागरिकांमध्ये रोष वाढत असल्याचे दिसून येत असल्याचेही नाना पटोले म्हणाले.

आज शेतकरी हवालदिल झाला आहे. नुकसान भरपाई मिळत नाहीये. बेरोजगारीमुळे तरुण हैराण आहेत. या सगळ्यांचे प्रश्न सोडवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काँग्रेस प्राधान्याने काम करीत आहे. दुसरीकडे सत्ताधारी याच्या घरात डोकाव, त्याच्या घरात डोकाव, मग घरे फोडा, दुसऱ्या पक्षांचे लोक तोडा, यातच गुंतली असल्याचा घणाघात नाना पटोले यांनी केला.

केंद्र सरकारने (Central Government) ईडी (ED) आणि सीबीआय (CBI) हे दोन बंदर पकडून ठेवले आहेत आणि त्यांना हाताशी धरून मदारीचा खेळ चालविला आहे. या यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न होतो आहे. सर्व परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत नागपूरच्या (Nagpur) सभेत एकत्र होतो. त्यावेळी त्यांच्या बोलण्यातून कुठेही ते भाजपकडे चालले असल्याचे जाणवले नाही. ते राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून जाणार नाहीत, असा ठाम विश्वास नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केला.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT