Sharad pawar Nana Patole uddhav Thackeray sarkrnama
विदर्भ

Video Nana Patole : विधानसभेच्या 300 जागा कुठून आणायच्या? नाना पटोलेंचा पवार, ठाकरे गटाला टोला

Congress Nana Patole Sharad pawar uddhav Thackeray : पटोले म्हणाले, प्रत्येक पक्षाला अपेक्षा असतात. त्या असल्‍याही पाहिजे. आम्ही 288 जागेची तयारी करीत आहोत. याचा अर्थ सर्व जागा लढवणार आहोत, असा होत नाही.

Rajesh Charpe

Nana Patole : लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाल्याने आता अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. विधानसभेत प्रत्येकजण 100 जागांचा मागांची मागणी करीत आहे. प्रत्येकाला 100 जागा दिल्यास 300 जागा तयार कराव्या लागतील, असे सांगून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपला त्रागा व्यक्त केला.

ठाकरे गट आणि पवार गटाकडून विधानसभेला 100 जागा मागण्यात येत असल्याच्या बातम्या मीडियातून येत आहेत. त्यामुळे पटोले यांनी त्रागा व्यक्त करत शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाला टोला लावल्याची चर्चा आहे.

प्रत्येक पक्षाला अपेक्षा असतात. त्या असल्‍याही पाहिजे. आम्ही 288 जागेची तयारी करीत आहोत. याचा अर्थ सर्व जागा लढवणार आहोत, असा होत नाही. आमच्या तयारीचा मित्रपक्षांनाही फायदा होऊ शकतो. लोकसभेत आम्ही एकत्र लढलो होतो. याच महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांना फायदा झाला. भाजपला पराभूत करण्यासाठी आम्ही एकत्र आलो. विधानसभेतही आघाडी कायम राहावी अशी आमची इच्छा आहे. मात्र प्रत्येकाने 100 जागांवर दावा केला तर 300 जागा कुठून आणण्याचा हा प्रश्न निर्माण होतो, असे पटोले Nana Patole म्हणाले.

जागा वाटपाचा अद्याप कुठलाही फॉर्म्युला ठरलेला नाही. महाविकास आघाडीची MVA एकत्रित बैठकसुद्धा झालेली नाही. महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. जागेची मागणी करताना हा आकडा प्रत्येकाने डोक्यात ठेवावा, असाही सल्ला पटोले यांनी आपल्या मित्रपक्षांना दिला आहे.

...म्हणून भाजपचा लोकसभेत पराभव

भाजपने मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या घोषणा केल्या होत्या. ओबीसी विरुद्ध मराठा अशी भांडणे लावली. समाजात तेढ निर्माण केले. आता याचे उत्तर भाजपलाच द्यावे लागणार. महाराष्ट्रातील जनतेला हे पटले नाही. त्यामुळे लोकसभेत भाजपचा पराभव केला.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT