Nana Patole Sarkarnama
विदर्भ

Nana Patole : हिंदूंच्या नावाने असलेली सरकारच हिंदूंना बरबाद करीत आहे !

Gondia : प्रतापगड येथे शिवरात्रीनिमित्त आयोजित यात्रेत नाना पटोले आले होते.

Abhijit Ghormare_Guest

Gondia District News of Nana Patole : केंद्रात आणि राज्यात हिंदूंच्या नावाचा उदो उदो करणाऱ्या पक्षाची सरकार आहे. पण हे सर्व ढोंग दाखवण्यासाठी आहे. प्रत्यक्षात हिंदूंच्या नावाने असलेली सरकारच हिंदूंना बरबाद करीत, आहे अशी घणाघाती टिका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

काल शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर आज गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगड येथे शिवरात्रीनिमित्त आयोजित यात्रेत नाना पटोले आले होते. दरम्यान त्यांनी पत्रकारांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला.ते म्हणाले, सांविधानिक व्यवस्था देशात वाचली नाही. सत्तेचा दुरुपयोग करून दुसऱ्यांना संपविण्याचे काम सरकार करीत आहे.

संविधान व्यवस्था देशात वाचली नसल्याने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, लोकशाहीमध्ये लोकांचा आशीर्वाद मोठा असतो. ज्या पद्धतीने धोक्याने आणि सत्तेचा दुरुपयोग करून कुणाला संपविण्याचे काम केले जात आहे. हे जनता मान्य करीत नाही. लोकशाहीमध्ये जनता मोठी असते आणि जनतेचा आशीर्वाद महत्वाचा असतो. येवढं या लोकांनी लक्षात ठेव्याला पाहिजे. असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

आज भगवान भोलेनाथांचा दिवस आहे. त्यामुळे मी राजकारणावर फार काही बोलणार नाही. मात्र देशात आणि राज्यात जे सरकार आहे, ते हिंदूंच्या नावावर असूनही हिंदूंना बरबाद करणारी सरकार आहे. त्यामुळे त्या सरकारबद्दल आज बोलणं चुकीचं ठरेल, असेही नाना पटोले म्हणाले. एक दोन माणसं घेऊन गेले, म्हणजे भाजप खूप मजबूत झाली, असं होत नाही, असेही त्यांनी सांगितले.

नाशिकमधला (Nasik) बदला नाना पटोले (Nana Patole) घेणारच. आमचा एक तुम्ही घेतला आहे, त्याचा हिशोब लवकरच चुकता करू. त्या भागात ४७ आमदार आहेत किमान ५० टक्के आमदार व खासदारांना काँग्रेस (Congress) पक्षाच्या चिन्हावर निवडून आणण्याचा माझा संकल्प आहे. चोरून घेऊन जाणार नाही, तर जनतेच्या मधात जाऊन निवडून आणू, असा निर्धारही नाना पटोले यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT