J. P. Nadda
J. P. Nadda Sarkarnama
विदर्भ

Narenda Modi दिल्लीत एक बटण दाबतात, अन् १२ कोटी लोकांना १५ सेकंदात पैसे पोहोचतात...

सरकारनामा ब्यूरो

BJP National President JP Nadda News : चंद्रपूर हा आदिवासीबहुल जिल्हा आहे. मी सुद्धा अशाच गाव, पहाडांतून आलेलो आहे. त्यामुळे समस्या मला चांगल्या प्रकारे माहिती आहेत. कॉंग्रेसच्या राज्यात दिल्लीतून १ रुपया पाठवल्यावर सामान्य माणसापर्यंत केवळ १५च पैसे पोहोचत होते, ८५ पैसे मधल्या मध्ये गायब होत होते, असे खुद्द तेव्हाच्या पंतप्रधानांनी म्हटले होते. पण नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) राज्यात ते दिल्लीत १ बटण दाबतात, अन् ११ कोटी ७४ लोकांना १५ सेकंदात पैसे पोहोचतात, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा आज म्हणाले.

जे.पी. नड्डा (J. P. Nadda) आज महाराष्ट्रात (Maharashtra) आहेत, विदर्भातील चंद्रपूर (Chandrapur) आणि मराठवाड्यातील संभाजीनगर येथे त्यांच्या जाहीर सभा आहेत. त्यांपैकी चंद्रपुरात त्यांची सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. श्री. नड्डा म्हणाले, भारतात अति गरिबी १ टक्क्यापेक्षा कमी झाली आहे. कारण पंतप्रधान गरीब कल्याण योजनेत ५ किलो गहू, ५ किलो तांदूळ आणि १ किलो तेल देण्याची व्यवस्था केंद्र सरकारने केली आहे. प्रत्येकाच्या घरात नळाच्या माध्यमातून पिण्याचे पाणी मिळेल, असे कधी वाटले नव्हते, पण आज जलजीवन मिशनच्या माध्यमातून ते होते आहे. राज्यातील ७ करोड २० लाख आणि चंद्रपूर जिल्ह्यातील १ लाख ४० हजार घरांत ‘हर घर नल, हर घर जल’ ही योजना कार्यान्वित झालेली आहे.

सुधीरजी (वनमंत्री सुधीर मुनगंटीवार) (Sudhir Mungantiwar) मी गाव-पहाडांतून आलो आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्याच्या समस्या मी चांगल्या समजू शकतो. आपण १२ कोटी आया-बहिणींना मान दिला आहे. उजाला योजनेच्या माध्यमातून महिला सशक्तीकरण केले आहे. मला आठवते, आमच्या गावात ४ वाजता महिला उठत होती. ५ वाजता जंगलात जात होती. लाकडं तोडून घरी येत होती. तेव्हा कुठे सकाळी ६ ते ७ वाजता तिच्या घरची चूल जळत होती आणि मुलं शाळेत आणि माणूस कामाला जात होता. पण आपण आज १२ कोटी घरांना गॅस दिला आहे. ५ मिनिटांत चहा आणि अर्ध्या तासात जेवण तयार होते. यामुळे सामान्य महिलांना ताकद मिळाली आहे.

किसान सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना बळ मिळाले आहे. कारण हा डिजिटल इंडिया आहे. किसान मानधनसह सर्व योजना शेतकऱ्यांना आणि सामान्य लोकांना ताकद मिळवून देण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी चांगले काम केले आहे. देशातील ४० टक्के लोकांना मोदींनी गंभीर आजारांशी लढण्यासाठी ५ लाख रुपये दरवर्षी देण्याची व्यवस्था केली आहे. या योजनेचा मुकाबला जगात कुणीच नाही करू शकत. कारण जेवढ्या लोकांना आपण ही सुविधा दिला आहे. त्याच्यापेक्षा कमी अनेक देशांची लोकसंख्या आहे, असेही जे.पी. नड्डा म्हणाले.

व्यासपीठावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार अनिल बोंडे, खासदार रामदास तडस, आमदार सर्वश्री रामदास आंबटकर, बंटी भांगडीया, संजीवरेड्डी बोदकुरवार संदीप धुर्वे, देवराव होळी, समीर कुणावार, अशोक उईके, कृष्णा गजबे यांच्यासह धर्मपाल मेश्राम, चंदन व्यास, नितीन फुतडा, अतुल देशकर, संजय धोटे, राजेश बकाने, जमान सिद्दीकी, अर्चना डेहनकर, किसन नागदेवे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT