Eknath shinde and Dr. Babanrao Taywade. Sarkarnama
विदर्भ

National OBC Federation News : ...तर मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यास आमची कुठलीही हरकत राहणार नाही !

Dr. Babanrao Taywade : त्यासाठी प्रत्येक कुटुंबाचा रेकॉर्ड तपासावा लागेल.

Atul Mehere

Nagpur OBC News : तीन पिढ्यांचे दस्तावेज शोधून महसुली किंवा शैक्षणिक कुणबी नावाची नोंद असेल, तर अशा लोकांना कुणबी समाजाचे प्रमाणपत्र म्हणजे ओबीसीचे प्रमाणपत्र देण्यात येतील, असा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (ता. सहा) जाहीर केला, तो योग नाही, असे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी म्हटले आहे. (For that, the record of each family has to be checked)

नागपुरात (Nagpur) आज (ता. सात) डॉ. तायवाडे (Dr. Babanrao Taywade) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, आम्ही आधीपासूनच म्हणतो आहे की, कुणाकडे जर आजोबा, पणजोबांचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र असेल, तर त्यांना ओबीसीचे (OBC) प्रमाणपत्र देण्याची पद्धत प्रचलित आहे. त्यात नव्याने काही करण्यात आलेले नाही आणि तसे केल्यास काहीही चुकीचे ठरणार नाही.

काही लोकांना आता नवनवीन माहिती मिळेल आणि ते तसतसे कागदपत्र गोळा करण्याच्या कामाला लागतील. पण त्यांना सामूहिक कागदपत्रांचा काही फायदा होणार नाही. त्यांना वैयक्तिक कागदपत्रे आणावे लागतील. त्यासाठी प्रत्येक कुटुंबाचा रेकॉर्ड तपासावा लागेल आणि त्यामध्ये जर कुणबी समाजाची नोंद असेल, तर आमची त्यावर कुठल्याही प्रकारची हरकत असणार नाही, असे डॉ. तायवाडे म्हणाले.

सरसकटपणे प्रमाणपत्र देण्याची पद्धत मराठवाड्यात सुरू करण्यात आली, तर त्याला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा विरोध असेल. कारण सरसकट प्रमाणपत्र देण्याची पद्धत अस्तित्वात नाही. विद्यार्थ्याला त्याच्या आजोबांचे, पणजोबांचे दस्तावेज दाखवावे लागतात, तेव्हाच त्याला ‘व्हॅलिडीटी’ मिळत असते. याव्यतिरिक्त दुसरा कुठलाही नवा नियम यासाठी आलेला नाही, असे डॉ. तायवाडे म्हणाले.

ज्या मराठा लोकांच्या कुठल्याच दस्तावेजावर कुणबी समाजाचा उल्लेख नाही, अशाही लोकांची कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी आहे. मराठ्यांना आरक्षण देण्यास आमचा कुठलाही विरोध नाही. परंतु जो ओबीसी समाज आज ६० टक्के आहे. त्याला फक्त २७ टक्के आरक्षण मिळत आहे. या २७ टक्क्यांमधून मराठा समाजाला आरक्षण देता कामा नये. त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, तर आम्ही त्यांच्या सोबत राहू, असेही डॉ. बबनराव तायवाडे यांनी सांगितले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT