Sharad Pawar and Praful Patel Sarkarnama
विदर्भ

NCP Crisis News: भुजबळांनंतर शरद पवारांचा मोर्चा प्रफुल्ल पटेलांकडे; २८ जुलैला गोंदियात बोलवला मेळावा

Sharad Pawar News: शरद पवार गोंदिया जिल्ह्यात घेणार मेळावा

सरकारनामा ब्यूरो

NCP : राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्षातील अनेकांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना पाठिंबा दिला. यामध्ये प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटलांसह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.

राष्ट्रवादीत झालेल्या बंडानंतर शरद पवारांनी थेट मैदानात उतरत छगन भुजबळांच्या येवल्यात पहिली जाहीर सभा घेतली. त्यानंतर शरद पवारांनी आता आपला मोर्चा प्रफुल्ल पटेलांकडे वळवला आहे.

प्रफुल पटेलांच्या गृह जिल्ह्यात अर्थात गोंदियात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा येत्या २८ जुलैला मेळावा होणार आहे. यासंदर्भातील माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव वीरेंद्र जायसवाल यांनी दिली. या मेळाव्यात शरद पवार प्रफुल पटेलांवर काय निशाणा साधणार, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पक्षात बंड करत सरकारमध्ये सामील होताना त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल हे सातत्याने दिसून आले. पण एकेकाळी हेच प्रफुल पटेल शरद पवारांचे अत्यंत विश्वासू मानले जात होते. मात्र, त्यांनी अजितदादांना साथ दिल्यामुळे आता शरद पवारांनी आपला मोर्चा त्यांच्याकडे वळवला आहे.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अनेक कार्यकर्तेही दुभंगले गेले. काहींनी शरद पवारांना साथ दिली. तर काही कार्यकर्ते अजित पवारांबरोबर गेले. त्यामुळे अशीच परिस्थिती गोंदियातही दिसून येते. गोंदिया जिल्ह्यात अजित पवार गटाचे प्रफुल पटेलांच्या विरोधात कोण पुढे येणार, हा चर्चेचा विषय असला तरी शरद पवारांच्या मेळाव्यातच नव्या जिल्हा कार्यकारिणीची घोषणा होणार आहे. त्यामुळे आता कोणत्या नव्या चेहऱ्यांना शरद पवार गोंदियातून संधी देतात हे लवकरच समजणार आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT