Navneet Rana, Bachchu Kadu Sarkarnama
विदर्भ

Navneet Rana : बच्चू कडू राजकारणात पुन्हा उभेच राहणार नाहीत..., नवनीत राणांनी नियोजनच तसं केलंय!

Navneet Rana On Bachchu Kadu : अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी प्रहारचे बच्चू कडू आणि व काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अचलपूर मतदारसंघातून कोणीच भगवा काढू शकत नाही, असं म्हणत बच्चू कडू यांची मतदारसंघात पुन्हा एन्ट्री न देण्याचा इशारा दिला.

Jagdish Patil

Amaravati News, 02 May : अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी प्रहारचे बच्चू कडू आणि व काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अचलपूर मतदारसंघातून कोणीच भगवा काढू शकत नाही, असं म्हणत बच्चू कडू यांची मतदारसंघात पुन्हा एन्ट्री न देण्याचा इशारा दिला.

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी या दोन्ही नेत्यांवर हल्लोबोल करत. अचलपूर मतदारसंघ कायम आपल्याकडेच ठेवण्याचा निर्धार बोलून दाखवला. शिवाय एक बहीण म्हणून प्रवीण तायडे यांच्या पाठीशी मी कायम असेन, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.

आपल्या भाषणात बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, "अचलपूर मतदारसंघात भगवा फडकावा यासाठी आमचे आमदार प्रवीण तायडे यांनी खूप कष्ट केले. ते आताही मी खूप छोटा माणूस असल्याचं म्हणतात. पण ही आमदारकीची निवडणूक एका व्यक्तीची नव्हती तर आमचा भगवा रंग या मतदारसंघ लढत होता.

या मतदारसंघात लढायला सुरूवात केली. तेव्हा माझ्या डोक्यात हेच होतं की या मतदारसंघातील लोकांना न्याय मिळाला पाहिजे. यापूर्वी इथे फक्त नौटंकी बघायला मिळायची, कधी नदीत, तर कधी विहरित, कधी टाकीवर बसणारे लोकप्रतिनिधी होते, असं म्हणत त्यांनी बच्चू कडू यांच्यावर टीका केली.

तर ज्याचं नशीब होतं ते 1 टक्के लोक निवडून आले, असं म्हणत खासदार बळवंत वानखडे यांच्यावर निशाणा साधला. शिवाय असे लोक खासदार झाले तरी तुम्ही मला साथ दिली. मला प्रचारा दरम्यान मतदार म्हणत होते आम्हाला भगव्यासाठी लढायचं आहे. पक्ष बाजूला ठेवून भगवा झेंडा समोर ठेवून लढायचं आहे.

जोपर्यंत देशाला हिंदू शब्द जोडला आहे तोपर्यंत या मतदारसंघातील भगवा कोणी काढू शकत नाही. आपल्याला हातात भगवा घेऊन लढावं लागेल बहीण म्हणून मी प्रवीण तायडे यांच्या पाठीशी कायम राहील अशा शब्दात त्यांनी या मतदारसंघातील आपली पकड मजबूत करण्याचे संकेत आमदार तायडे यांना दिले.

शिवाय येणाऱ्या काळात आपली लढाई मतदारसंघातील तरूणांच्या भविष्यासाठीची लढाई असेल त्यामुळे आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि सर्व स्थानिकच्या निवडणुकांत भगवा फडकवायचा आहे, असं आवाहन त्यांनी उपस्थित कार्यकत्यांना केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT