Navnit Rana
Navnit Rana Sarkarnama
विदर्भ

Navnit Rana : नवनीत राणा को गुस्सा क्यू आया? पोलिसांवर भडकल्या खासदार राणा !

सरकारनामा ब्यूरो

अमरावती : अमरावतीच्या (Amravati) राजापेठ पोलिस स्टेशन अंतर्गत एका 19 वर्षे हिंदू युवतीचे काल अपहरण झाले. मुलीने केलेल्या चॅटिंगवरून पोलिसांनी सोहेल शहा नामक संशयित आरोपीला राजापेठ पोलिस ठाण्यात आणले. मात्र तोपर्यंतही मुलीचा शोध न लागल्याने भारतीय जनता पक्ष, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते व अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आक्रमक झाल्या.

आरोपींनी मुलीला डांबून ठेवल्याचा आरोप यावेळी नवनीत राणा (MP Navnit Rana) व इतर कार्यकर्त्यांनी केला. या प्रकरणात नवनीत राणा यांनी पोलिसांना कॉल केला असता, पोलिसांनी तो कॉल रेकॉर्ड केला. बस्स यावरून खासदार राणा यांचा पारा चढला. त्यांनी पोलिसांना (Police) याचा जाब विचारला. तेथे मोठा वाद निर्माण झाला. खासदार राणा आणि पोलिसांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. बराच वेळ हा वाद पोलिस ठाण्यात सुरू होता. वातावरण तणावपूर्ण झाले होते. जनतेच्या प्रश्‍नावर नवनीत राणा नेहमीच आक्रमक भूमिका घेतात. त्यामुळे नवनीत राणा को गुस्सा क्यों आता है, अशी चर्चा पोलिस स्टेशन परिसरात होती.

१९ वर्षीय युवतीचे अपहरण केल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला. या प्रकरणामध्ये सोहेल शहा नावाच्या युवकाला पोलिसांनी चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आणलेले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी व माहिती घेण्यासाठी नवनीत राणा यांनी राजापेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांना कॉल केला असता तो कॉल रेकॉर्ड केल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला. त्यावरून राजापेठ पोलिस ठाण्यातच पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे व पोलिस उपायुक्त विक्रम साळी यांच्यावर नवनीत राणा चांगल्याच भडकल्या.

मी मागासवर्गीय असल्याने माझा कॉल रेकॉर्ड केला, असा आरोप करत ठाणेदार मनीष ठाकरे यांचा फोन हिसकावून घेतला. त्यावेळी पोलिस व नवनीत राणा यांच्यामध्ये चांगलाच राडा पाहायला मिळाला. गेल्या दहा दिवसांतील ही पाचवी घटना असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला व पोलिस तातडीने पोलिस कारवाई करत नसल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला. दरम्यान खासदार राणा यांनी मुलीच्या आईला आपल्या सोबत घरी नेले.

काल दुपारी अकरा वाजता पासून मुलगी घराबाहेर असल्याने व तिचा कुठेच पत्ता लागत नसल्याने मुलीची आई सतत रडत आहे. ही मुलगी मला परत द्या, असा टाहो मुलीची आई कालपासून करत आहे. काल मुलगी घरून गेल्याची तक्रार राजापेठ पोलिस ठाण्यात प्राप्त झाली आहे. आम्ही या प्रकरणी चौकशीसाठी संशयित युवकाला ताब्यात घेतलेले आहे. मुलगी व मुलगा हे दोघेही अज्ञान आहेत. त्यामुळे चौकशी केली जाईल व चौकशीनंतर पूर्ण कारवाई केली जाईल, असे पोलिस उपायुक्त विक्रम साळी यांनी सांगितले. तसेच नवनीत राणा यांच्या रेकॉर्ड झालेल्या कॉलसंदर्भात ठाणेदार मनीष ठाकरे यांचा तो वैयक्तिक मोबाईल आहे. त्यात ऑटोमॅटिक कॉल रेकॉर्डरद्वारे कॉल रेकॉर्ड झाला असावा, असं उपायुक्त विक्रम साळी यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT