Navneet Rana, Ajit Pawar Sarkarnama
विदर्भ

Navneet Rana : या भेटीमागे दडलंय काय?

Meeting With Ajit Pawar : नवनीत राणा यांनी अजित पवारांची भेट घेतली

Amar Ghatare

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी शनिवारी (9 डिसेंबर) अजित पवार यांची भेट घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या भेटीत नक्की काय झाले, हे समोर आले नसले तरी लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांनी पाठिंबा द्यावा, यासाठी नवनीत राणा यांनी भेट घेतल्याची चर्चा आहे.

नवनीत राणा यांना २०१९ लोकसभा निवडणुकीत अमरावतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला होता, तर २०१४ मध्ये नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती, पण त्यावेळी त्या पराभूत झाल्या होत्या, 2019 मध्ये विजयी झाल्यानंतर नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी कायम भाजपच्या पाठीशी उभे राहणे पसंत केले. तेव्हापासून नवनीत राणा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे संबंध ताणले गेले होते.

यंदा जुलैपासून परिस्थिती बदलली आहे. अजित पवार महायुती सरकारमध्ये आल्यानंतर अजित पवार भाजपप्रणित एनडीएमध्ये सहभागी झाले आहेत. त्यातच आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार नवनीत राणा यांनी अजित पवारांची भेट घेतली. या भेटीत लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची अपेक्षा व्यक्त केल्याचे समजते.

या भेटीवर नवनीत राणा स्पष्ट तरीही जपून वक्तव्य केले. अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत, अमरावतीमध्ये आले होते. याशिवाय ते एनडीएचे घटक आहेत. त्यामुळे भेट घेतली, असे त्या म्हणाल्या. यापूर्वी त्यांचा आपल्याला पाठिंबा होता. आम्ही नेहमीच अजितदादांसोबत आहोत. राष्ट्रवादीच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणार का, यावर त्यांनी कोणतेही स्पष्ट विधान केले नाही. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर प्रथमच नवनीत राणा यांनी अजित पवार यांची भेट घेतली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नवनीत राणा या अमरावतीच्या अपक्ष खासदार असून, त्यांनी कायम भाजपच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत त्या भाजपकडे उमेदवारी मागणार का, की अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे विचारणा करणार किंवा पुन्हा एकदा अपक्ष म्हणून युवा स्वाभिमान पक्षाच्या तिकिटावर उभे राहून अजित पवारांचा पाठिंबा मागणार, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. नवनीत राणा आणि अजित पवार यांच्या या भेटीमुळे आता कोणती राजकीय घडामोड घडणार, याची सर्वांना उत्सुकता लागून आहे.

(Edited by - Avinash Chandane)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT