Navneet Rana, Amravati Police Commissioner Arti Singh  Sarkarnama
विदर्भ

Navneet Rana : राणा दांपत्यानं करुन दाखवलं! अमरावतीच्या पोलीस आयुक्तांची अखेर बदली

Police Commissioner Arti Singh Transfer : आरती सिंह यांच्या बदलीमागे राणा दांपत्याशी घेतलेला पंगा हे कारण?

सरकारनामा ब्यूरो

Navneet Rana And News : प्रशासकीय सेवेतील 30 आयपीएस अधिकाऱ्यांच्या अखेर बदल्या झाल्या आहेत. यात विश्वासराव नांगरे पाटील, अमिताभ गुप्ता, अंकुश शिंदे यांच्यासह अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांचा देखील समावेश आहे. सिंह यांच्या बदली निमित्ताने अखेर खासदार नवनीत राणा (Navneet Rana) व आमदार रवि राणा दांपत्याने आपला शब्द खरा करुन दाखवला असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे.

अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह (Arti Singh) यांची बदली झाली आहे. सिंह यांची बदली अप्पर पोलीस आयुक्त सशस्त्र सीमा बल बृहन्मुंबई येथे करण्यात आली आहे. तर, नागपूर पोलीस पोलीस आयुक्तालयातील नवीन चंद्र रेड्डी हे आता अमरावतीचे नवीन पोलीस आयुक्त असणार आहेत. सिंह यांनी अमरावती पोलीस आयुक्त पदाचा कालावधी पूर्ण केल्यानंतर बदली होण्याची शक्यता खरी ठरली. मात्र, आरती सिंह यांच्या बदलीमागे राणा दांपत्याशी घेतलेला पंगा हेही कारण असल्याच्या चर्चा आहेत.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना खासदार नवनीत राणा व आमदार रवि राणा आणि अमरावतीच्या पोलीस आयुक्त यांच्यात कायमच खटके उडालेले पाहायला मिळाले होते. अमरावतीमधील उड्डाणपुलावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, अमरावती दंगल, कथित लव्ह जिहाद प्रकरण यांसारख्या अनेक मुद्द्यांवरुन पोलीस आयुक्त आरती सिंह आणि राणा दांपत्यांतील वाद विकोपाला गेले होते. नवनीत राणा व रवि राणा यांच्याकडून आरती सिंह यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या कामकाजाच्या शैलीवर प्रश्नचिन्ह देखील निर्माण केले होते.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी डॉ. आरती सिंह यांच्यावर अनेक आरोप केले होते. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आलं होतं. यानंतर काहीच दिवसांत नवनीत राणा यांनी शिंदे फडणवीस यांच्याकडे आरती सिंह यांच्या बदलीची मागणी केली होती. तसेच रवि राणा यांनी देखील गणेशोत्सवानंतर सिंह यांची बदली होईल असा दावा केला होता. तो दावा खरा ठरल्याची चर्चा आहे.

कथित 'लव्ह जिहाद' प्रकऱणी नवनीत राणा 'बॅकफूट'वर!

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि भाजपाच्या अनेक नेत्यांनी कथित ' लव्ह जिहाद' प्रकरणावरून अमरावती पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. खासदार राणांनी तर फोन रेकॉर्डिंगवरून पोलीस उपायुक्तांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जाब विचारत पोलीस आरोपींवर कारवाई करत नसल्याचा आरोपही केला होता.

पोलिसांनी या बेपत्ता तरुणीला अवघ्या काहीच तासांत शोधून काढले. या तरुणीच्या स्टेटमेंटमुळे नवनीत राणांच्या अडचणी वाढल्या होत्या. यानंतर आता स्वतः अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी या प्रकरणावर पोलिसांच्या वतीने पहिली प्रतिक्रिया दिली असून संबंधित मुलगी ही स्वतः घरातून निघून गेल्याची माहिती त्यांनी दिली होती. यामुळे राणा यांनी केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राणा दांपत्य बॅकफूटवर गेले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT