(MP Navnit Rana
(MP Navnit Rana Sarkarnama
विदर्भ

Navnit Rana:आमच्या मुलींना कुणी फूस लावून पळवीत असेल, तर तिला वाचवणे हे आमचे कर्तव्य

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : पोलिस खात्यात अशी काही लोक आहेत की जे त्यांच्या पदाचा गैरवापर करीत आहेत. चुकीच्या पद्धतीने प्रकरणे दाखल करवून घेतली जात आहेत. मी आणि आमदार रवी राणा यांच्यावर कशाही पद्धतीने गुन्हे कसे दाखल करता येतील, यासाठी सातत्याने काही पोलिस अधिकारी प्रयत्नरत आहेत. ज्या कामासाठी मी पोलिस स्टेशनमध्ये गेली होती, ते काम इमानदारीने केले. त्याचा परिणाम म्हणून ती मुलगी सापडली. त्यानंतर तिला आम्ही तिच्या आईवडिलांकडे सोपविले, असे नवनीत राणा म्हणाल्या.

मुंबईला रवाना होण्यापूर्वी त्या नागपूर विमानतळावर (Nagpur Airport) पत्रकारांशी बोलत होत्या. खासदार राणा (MP Navnit Rana) यांच्या विरोधात भीम आर्मीने काल अमरावतीमध्ये (Amravati) मोर्चा काढला होता. त्याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, त्या मुलीला सोडविणे आमचे कर्तव्य होते आणि ते आम्ही निष्ठेने पार पाडले. आता कुणाला काय कारवाया करायच्या आहेत, त्या करू द्या. कारण आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा यांच्यावर कुठल्या ना कुठल्या पद्धतीने गुन्हे दाखल करायचे, हा पोलिस आयुक्त आरती सिंह यांचा प्रयत्न नेहमी असतो. पण नवनीत राणा कुणालाही घाबरत नाही. आमच्या मुलींना कुणी फूस लावून पळवीत असेल, तर तिला वाचवणे आमचे कर्तव्य आहे आणि अधिकारसुद्धा. त्यामुळे अशा कारवायांची भीती वाटत नाही, असेही खासदार राणा म्हणाल्या.

अमरावतीच्या राजापेठ पोलिस ठाण्यात झालेल्या प्रकारानंतर पोलिस पत्नीने राणांना खडे बोल सुनावले आहेत. याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, ती पोलिस पत्नी शिवसेनेची कार्यकर्ती आहे आणि मी तिला ओळखतही नाही. या प्रकरणात डीसीपींसमोर मी जी तक्रार केली आणि ज्यांच्या विरोधात केली, त्यांचे कुटुंबीय बाहेर येऊन स्वतः तक्रार करतील, तर त्यांची तक्रार निश्‍चितच ऐकली जाईल. ज्या लोकांवर आधीच गुन्हे दाखल आहेत, अशा लोकांनी माझ्याबद्दल बोलूच नये. कारण मी जे करत आहे, ती न्यायाची लढाई आहे आणि माझ्या लोकांसाठी आहे आणि ही लढाई मी लढत राहणार आहे.

जो व्यक्ती काहीतरी काम करतो, त्यालाच कुठे ना कुठे विरोध होत असतो. एका कुटुंबातील पळवून नेलेल्या मुलीला वाचवून त्यांच्या सुपूर्द केल्यामुळेच काही जण आमचा विरोध करीत आहेत. त्यामुळे जाणीवपूर्वक आमच्यावर गुन्हे दाखल करण्याचा घाट घातला जात आहे. चांगली कामे केल्यावर जर गुन्हे दाखल होत असतील, तर त्याची पर्वा नाही. आम्‍हाला रोखण्याचा कुणी कितीही प्रयत्न केला, तरीही आम्ही आमचे काम करतच राहणार, असे खासदार नवनीत राणा यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT