Navneet Rana & Devendra Fadnavis Sarkarnama
विदर्भ

Devendra Fadanvis News : नवनीत राणा भाजपच्या कमळ चिन्हावर लढणार ? अमरावतीच्या जागेबाबत फडणवीसांचे मोठे संकेत

Bjp News : अमरावतीची जागा भाजप लढवणार अशी घोषणा केल्यामुळे शिंदे गटाच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे दुसरीकडे अपक्ष आमदार नवनीत राणा या अपक्ष म्हणून लढणार की, भाजपच्या चिन्हावर लढणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

Sachin Waghmare

Political News : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून सर्वांना अमरावती लोकसभा निवडणुकीत काय हॊणार, याची उत्सुकता लागली होती. शिंदे गट आणि अपक्ष आमदार नवनीत राणा व भाजपमध्ये या जागेवरून मोठी रस्सीखेच सुरू असतानाच मोठी बातमी समोर आली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघाबाबत मोठं विधान केलं आहे. अमरावतीची जागा भाजप लढवणार, अशी घोषणा केल्यामुळे शिंदे गटाच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे दुसरीकडे अपक्ष आमदार नवनीत राणा या अपक्ष म्हणून लढणार की भाजपच्या चिन्हावर लढणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. ( Devendra Fadanvis News )

अमरावती लोकसभेची जागा भाजपच लढणा असल्याचे सांगत फडणवीस यांनी अमरावती मतदारसंघाबाबत असलेला सस्पेन्स संपवला आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या हातून ही जागा सुटल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे माजी खासदार आनंदराव अडसूळ आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी अकोल्यात आले होते. या वेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी अमरावती लोकसभेची जागा भाजप लढेल. जो उमेदवार असेल तो भाजपच्या चिन्हावर लढेल. नवनीत राणा तिथल्या विद्यमान खासदार आहेत. नवनीत राणा पूर्ण पाच वर्षे भाजपसोबत राहिल्या आहेत. पाच वर्षे त्यांनी लोकसभेमध्ये ताकदीने भाजप आणि मोदींची बाजू मांडली आहे. शेवटी अंतिम निर्णय आमचं पार्लमेंट्री बोर्ड आणि निवडणूक कमिटी घेईल. त्याबद्दल यापेक्षा अधिक काहीही सांगू शकत नाही, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

अडसूळ यांच्या राजकीय भवितव्यावर बोलणं टाळले

या वेळी त्यांना आनंदराव अडसूळ (anadrao Adsul) यांच्याबाबत विचारण्यात आलं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ज्या ठिकाणी भाजपला (Bjp) जागा सुटेल, त्या ठिकाणी शिवसेनेने (Shivsena) काम करायचं आहे. जिथे शिवसेनेला जागा सुटेल, तिथे आम्ही त्यांचे काम करायचं आहे. जिथे राष्ट्रवादीला सुटेल तिथे आम्ही दोघांनी काम करायचं आहे, असं सांगत फडणवीस यांनी अडसूळ यांच्या राजकीय भवितव्यावर बोलणं टाळले.

R

SCROLL FOR NEXT