The meeting was organized at Nehru Maidan in Amravati : मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाले. या नऊ वर्षांचा लेखाजोखा मांडण्यासाठी अमरावतीच्या नेहरू मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला संबोधित करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी असे वक्तव्य केले की, त्यामुळे खासदार नवनीत राणा चांगल्याच टेंशनमध्ये आल्या. (MP Navneet Rana came under big tension)
खासदार नवनीत राणा यांनी नेहमीच भाजपची बाजू मांडलेली आहे. नव्हे तर पडत्या वेळातही त्यांनी भाजपची बाजू उचलून धरली. ‘हनुमान चालिसा पठण आंदोलन’, हा त्यातीलच एक भाग होता. भाजपसाठी समर्पित भावनेने काम करणाऱ्या नवनीत राणा यांच्यावर अशी वेळ का यावी, हा प्रश्न कालपासून (ता. २१) अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.
काय म्हणाले प्रदेशाध्यक्ष बावनकुळे?
कालच्या भाषणात आमदार बावनकुळे म्हणाले की, आता गरुडाने ठरवले आहे की, पुन्हा एकदा गगन भरारी घ्यायची. येवढी मोठी झेप घ्यायची आहे की, महाराष्ट्रात २००+ आमदार आणि लोकसभेमध्ये अमरावतीसह ४५+ खासदार निवडून आणायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ही गरुडझेप घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला घर चलो अभियान प्रभावीपणे राबवायचे आहे.
देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते आहेत. त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करतोय, असे खासदार नवनीत राणा (Navnit Rana) आणि त्यांचे पती बडनेऱ्याचे आमदार रवी राणा हे नेहमी सांगतात. असे असताना अमरावतीमध्ये भाजपचा खासदार निवडून आणण्याची आमदार बावनकुळेंनी केलेली भाषा त्यांच्या समर्थकांच्या पचनी पडली नाही. त्यामुळे राणा परिवार आणि भाजपमध्ये दुरावा निर्माण झाला का, असाही प्रश्न चर्चिला जात आहे. यासंदर्भात खासदार नवनीत राणा यांच्याशी संपर्क साधला. पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
उद्धव ठाकरेच गद्दार..
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नादी लागून उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाशी फारकत घेतली. ही बाब त्यावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व शिवसेनेच्या सर्व आमदारांना कळली होती आणि म्हणूनच त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भारतीय जनता पक्षाची कास धरली. हिंदुत्वाशी फारकत घेणारे उद्धव ठाकरेच खरे गद्दार आहेत, असेही चंद्रशेखर बावनकुळे काल (ता. २१) म्हणाले.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.