Old Pension Scheme Sarkarnama
विदर्भ

Old Pension Scheme : नक्षल्यांचे जुन्या पेन्शन योजनेला समर्थन! बॅनर आढळल्याने खळबळ

Old Pension Scheme News : गेल्या आठवड्यात जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचारी संपावर गेले होते.

Abhijit Ghormare_Guest

Gondia News : गेल्या आठवड्यात जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचारी संपावर गेले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आश्वासन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे. मात्र, रविवारला २६ मार्चला गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील आमगाव-सालेकसा मार्गावर बाघ नदीच्या पलीकडे 'सीपीआय माओवादी' या नक्षल संघटनेचे जुन्या पेन्शनला (Old Pension Scheme) समर्थन दिले असल्याचे बॅनर आढळून आले आहे. यामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे.

यातील बॅनरवर नवीन पेन्शन योजना रद्द करण्यात यावी, ठेकेदारीकरणही बंद करण्यात यावे. मेस्मा कायदा लागू करणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारचा निशेष अशा घोषणा बॅनरवर लिहिलेल्या आहेत. सोबतच त्यांनी एक पत्रकही काढले आहे. हे पत्रक महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश छत्तीसगड झोनल (माओवादी) कमेटीचे प्रवक्ता अनंत यांच्या नावे आहे.

फलक लागलेले असल्याची माहिती मिळताच ते काढण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू केला असल्याची माहिती सालेकसा चे पोलीस निरीक्षक बोरसे यांनी दिली आहे. या संदर्भात विचारणा केली लावण्यात आलेले फलक नक्षल्यांनीच लावले की कुणी कुरघोडी करण्याच्या उद्देशाने लावले, याचा तपास सुरू असल्याची माहिती गोंदिया जिल्हा नक्षल सेलचे प्रमुख दिनेश तायडे यांनी दिली आहे.

जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी जुन्या पेन्शन योजनेवर मार्ग काढणार असल्याचे सांगितले. तसचे जुन्या पेन्शन योजनेचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने एक समिती स्थापन केली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले होते. मात्र, नक्षल्यांनी लावलेल्या बॅनरमुळे एकच खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT