Supriya Sule Sarkarnama
विदर्भ

अब्दुल सत्तारांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक, तर भाजप महिला नेत्यांची सावध प्रतिक्रिया...

अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना उद्देशून अपशब्द वापरल्याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले. नागपुरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सत्तार यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली

Atul Mehere

नागपूर : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यामुळे राज्यभर संतापाची लाट आहे. सत्तारांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे समाधान झालेले नाही. सत्तारांच्या राजीनाम्याच्या मागणीवर कार्यकर्ते ठाम आहेत. ही टीका सत्तारांना चांगलीच महागात पडल्याचे दिसत आहे.

अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना उद्देशून अपशब्द वापरल्याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले. नागपुरातील (Nagpur) राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) महिला नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सत्तार यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली तर भाजप महिला नेत्यांनी सावध पवित्रा घेतला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला नेत्यांनी संताप व्यक्त केला. भाजपच्या महिला नेत्यांनी मात्र यावर बोलण्याचे टाळले. भाजयुमोच्या (BJYM) प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे यांना याबाबत फोनवरून प्रतिक्रिया विचारली असता आवाज स्पष्ट येत नसल्याचे कारण पुढे केले. त्यानंतर त्यांनी फोन उचलण्याचे टाळले. राष्ट्रवादीच्या नेत्या व राज्य महिला आयोगाच्या सदस्या आभा पांडे व प्रवक्त्या नूतन रेवतकर यांनी सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

अब्दुल सत्तार यांचे निर्लज्ज व्यक्तव्य महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंकित करणारे आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या सत्तार यांना मंत्रिमंडळातून तत्काळ काढण्यात यावे. अशा नेत्याला त्याच्या भाषेतच उत्तरे देण्यात येईल.

-आभा पांडे, राष्‍ट्रवादीच्या नेत्या व सदस्या, राज्य महिला आयोग.

अब्दुल सत्तार यांचे मानसिक संतुलन बिघडलं आहे. त्यांचा जाहीर निषेध करतो. त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची माफी मागावी तसेच तत्काळ राजीनामा द्यावा अन्यथा आम्ही आंदोलन करणार.

-नूतन रेवतकर, प्रवक्त्या राष्ट्रवादी कॉंग्रेस, नागपूर शहर.

खासदार सुप्रिया सुळे यांना अपशब्दात बोललो नाही, असे अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले आहे. माध्यमांनीही सत्तार असे बोलले यांचा स्पष्ट व्हिडिओ दाखवला नाही.

-नंदा जिचकार, भाजप नेत्या व माजी महापौर.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT