Sharad Pawar, Ajit Pawar Sarkarnama
विदर्भ

NCP News Video : जी बापाची झाली नाही ती तुमची कशी होईल? अजितदादांच्या नेत्याचा शरद पवार गटाला सवाल

Jagdish Patil

Chandrapur News, 07 Sept : विरोधकांकडून माझ्या मुलीला हाताशी धरून पक्ष फोडण्याचे काम केले जात आहे. जी मुलगी बापाची नाही झाली ती तुमची कशी होणार, असं प्रश्न उपस्थित करत अजित पवार गटाचे नेते तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) यांनी शरद पवार गटावर निशाणा साधला आहे.

शिवाय पक्ष फोडी करणारा पक्ष आता माझे घर फोडण्याचे काम करत असल्याचा आरोपही त्यांनी शरद पवार गटावर केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री शरद पवारांच्या (Sharad Pawar) गटातून विधानसभा निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. याच सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरातील एका कार्यक्रमात बोलताना आत्राम म्हणाले, "विरोधकांकडून माझ्या मुलीला हाताशी घेऊन पक्ष फोडण्याचे काम सुरू आहे. पण जी मुलगी बापाची नाही झाली ती तुमच्या पक्षाची कशी होणार?

माझ्याकडे दुधारी तलवार आहे, माझ्या वाटेला गेलात तर म्यानामधून तलवार बाहेर काढणार. आमचे घराणे हलगेकरांना नदीत टाकल्याशिवाय राहणार नाही, असं आपल्या जावयाचे आडनाव घेत त्यांनी धमकी देखील दिली. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांची मुलगी शरद पवारांच्या संपर्कात असल्याचं स्पष्ट झालं आहे. तसंच यावेळी त्यांनी जे माझ्या खुर्चीवर बसण्याचे स्वप्न बघतायत त्यांना मी बाजुला करणार असल्याचा इशाराही दिला आहे. या भूमीवरील गरीब, श्रीमंत सर्वांना न्याय मी दिला आहे.

पतीसोबत शरद पवार गटात प्रवेश

गेली 50 वर्षे मी काम करत असून मध्येच येऊन असे वातावरण तयार करणार असतील तर त्यांची वाट लावायचे काम मी करणार असल्याचं आत्राम म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर आता शरद पवार गट काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, मंत्री आत्राम यांची मुलगी 11 किंवा 12 तारखेला पतीसोबत शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे आगामी काळात बाप विरुद्ध मुलगी अशी लढत होण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT