Ajit Pawar News  Sarkarnama
विदर्भ

Ajit Pawar News : अमरावती जिल्ह्यातील 'या' विद्यमान आमदारालाच अजितदादांनी ठेवलं 'होल्ड'वर

NCP Ajit Pawar Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांना सोडून महायुतीत सहभागी झाले. त्यावेळी या आमदारांनाही गुवाहाटीला बोलावण्यात आले होते. शिंदे शिवसेनेकडून त्यांना खुली ऑफर देण्यात आली होती. मात्र, अजित पवार यांनीच त्यांना रोखले होते.

Rajesh Charpe

Nagpur News : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 38 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात विदर्भातील पाच मतदारसंघाचा समावेश आहे. असे असले तरी दादांसोबत असलेल्या विदर्भातील एका आमदाराचे नाव यादीत नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

भाजप हा मतदारसंघ आपल्याकडे घेण्यासाठी चांगलाच दबाव वाढवत असल्याचे सांगण्यात येते. मोर्शी मतदारसंघात भाजप निवडणूक लढण्याची तयारी करत आहे. तेथे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार देवेंद्र भुयार यांना उमेदवारी दिली तर येथे भाजपमधूनच बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी विधानसभा मतदारसंघातून देवेंद्र भुयार हे २०१९च्या निवडणुकीत अपक्ष निवडून आले होते. अजित पवार (Ajit Pawar) महायुतीत सहभागी झाल्यानंतर भुयार त्यांच्यासोबत होते. अजितदादा यांनीसुद्धा त्यांचा चांगलेच बळ दिले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांना सोडून महायुतीत सहभागी झाले. त्यावेळी भुयार यांनाही गुवाहाटीला बोलावण्यात आले होते. शिंदे शिवसेनेकडून त्यांना खुली ऑफर देण्यात आली होती. मात्र, अजित पवार यांनीच त्यांना रोखले होते. त्यानंतर स्वतः अजित पवार हेसुद्धा महायुतीत सहभागी झाले.

आमदार देवेंद्र भुयार हे त्यांच्यासोबत महायुतीत सहभागी झाले आहेत. मात्र, आज राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत नाव नसल्याने भुयार यांचा चांगलाच धक्का बसला आहे. त्यांनी तातडीने मुंबई गाठली आहे. कुठल्याही परिस्थिती तिकीट घेऊनच येतो असा त्यांचा दावा आहे.

मोर्शी विधानसभा मतदारसंघात भुयार यांनी मागील निवडणुकीत भाजपचे तत्कालीन मंत्री अनिल बोंडे यांना पराभवाचा धक्का दिला होता. बोंडे यांचे भाजपने राज्यसभेवर पाठवून पुनर्वसन केले आहे. मात्र, हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला जाऊ नये असे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळेच या मतदारसंघाचा निर्णय घेण्यात आला नसल्याचे समोर आले आहे.

मोर्शी मतदारसंघात भाजप निवडणूक लढण्याची तयारी करीत आहे. भुयार यांना उमेदवारी दिली तर येथे भाजपमधूनच बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अमरावतीमधून आमदार सुलभा खोडके, अहेरी येथून आमदार धर्मराव बाबा आत्राम, पुसदमधून आमदार निलय नाईक, तुमसरमधून आमदार राजू कारेमोरे आणि अर्जुनी मोरगाव येथून राजकुमार बडोले यांची उमेदवार जाहीर केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT