Ajit Pawar Sarkarnama
विदर्भ

Ajit Pawar : हिवाळी अधिवेशन अर्धवट सोडत अजित पवार तातडीनं मुंबईत; काय आहे कारण?

Ajit Pawar Mumbai Visit : अजित पवार यांच्या मुंबई दौर्यासाठी शिंदे सरकारकडून विमानाची सोय

सरकारनामा ब्यूरो

Ajit Pawar Emergency Mumbai Visit : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार हे नागपूरहून तातडीनं मुंबईला येणार आहे. हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलेलं असताना पवार हे मुंबईला येत असल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मात्र, या मुंबई दोर्यासाठी शिंदे फडणवीस सरकारनेच त्यांना विमान उपलब्ध करुन दिल्याची माहिती समोर येत आहे. (Ajit Pawar Emergency Mumbai Visit )

अजित पवार (Ajit pawar) हे दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नागपूरहून मुंबईला रवाना होणार आहे. शासकीय विमानाने ते मुंबईत दाखल होतील आणि पुन्हा त्याच विमानानं नागपूरला परत जातील. आणि त्यानंतर ते हिवाळी अधिवेशनात सहभागी होणार आहे.

अजित पवारांचा मुंबई दौऱ्यामागं काय आहे कारण?

माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांचा मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातून सुटका होणार आहे. देशमुख यांच्या जामीन अर्जाला स्थगिती देण्याची सीबीआयची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यानंतर देशमुख हे तब्बल 1 वर्षांपेक्षा जास्त कालावधीनंतर तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अजित पवार काय म्हणाले?

अनिल देशमुख आज आज सुटण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांना मुंबई बाहेर जाता येणार नाही. त्यामुळे मुंबईला जाण्याचा जयंत पाटील आणि माझा प्रयत्न आहे. काल शिंदे यांनी विचारले, आपण बॅक मीटिंग घेऊ. त्यावेळी मला मुंबईला जायचं आहे असं त्यांना मी सांगितलं. त्यांनी मला शासनाचं विमान उपलब्ध करुन दिलं. मी माझा कार्यक्रम बदलवला असून शासनाच्या विमानानं 1 वाजता मुंबईला जाणार आहे. त्याच विमानानं परत नागपूरला येईल. आणि त्यानंतर अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होईल अशी माहितीही पवार यांनी दिली.

यावेळी त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेतेमंडळी उपस्थित राहणार आहे.याचवेळी अजित पवार हे देखील देशमुख यांच्या स्वागताला मुंबईला येणार आहे. यावेळी राष्ट्रवादी व देशमुख यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादीकडून आर्थर रोड जेल ते सिद्धिविनायक मंदिर दरम्यान बाईक रॅली देखील काढण्यात येणार आहे.

अजित पवार यांच्या मुंबई दौर्यासाठी शिंदे सरकारकडून विमान उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. विरोधी पक्षनेत्याला तातडीची विमानसेवा उपलब्ध करुन देण्याची सोय सरकार दरबारी आहेत. मात्र, त्यासाठी कारण द्यावं लागतं. त्या कारणाची पडताळणी केल्यानंतरच विमानाची परवानगी देण्यात येते. दरम्यान, अजित पवार यांनी मुंबईत दौर्यामागं केवळ तातडीचं काम असल्याची माहिती शिंदे सरकारला दिली आली. त्यानुसार सरकारकडून अजिक पवार यांना विमान उपलब्ध करुन देण्यात आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT