Vaishali Made  Sarkarnama
विदर्भ

"माझ्या हत्येचा कट रचला जातोय"; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Vaishali Bhaisane - Made | NCP | : आपल्या जिवाला धोका असल्याचा खळबळजनक दावा

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : सुप्रसिद्ध गायिका आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विदर्भ विभागीय अध्यक्षा वैशाली भैसने-माडे (Vaishali Bhaisne-Made) यांनी आपल्या जिवाला धोका असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. नुकतीच फेसबुकवर पोस्ट करून त्यांनी आपल्या जिवाला धोका असल्याचं सांगितलं आहे. मात्र नेमका कोणाकडून जीवाला धोका आहे आणि कोण हत्येचा कट रचत आहे याबाबत त्यांनी सविस्तर सांगितले नसले तरीही पुढील दोन दिवसांनंतर पत्रकार परिषद घेऊन या गोष्टी सांगणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

काय आहे वैशाली भैसने- माडे यांची पोस्ट

काही लोकांकडून माझ्या जिवाला धोका आहे. माझ्या हत्येचा कट रचला जातोय. 2 दिवसानंतर पत्रकार परिषद घेऊन याचा गौप्यस्फोट मी करणार आहे. आज मला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे.'

कोण आहे वैशाली माडे?

अत्यंत हालाखीच्या परिस्थितीमधून येत वैशाली भैसने-माडे यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत पार्श्वगायिका म्हणून मोठं नाव मिळवलं आहे. मराठी सारेगमप या शोची विजेती ठरल्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर हिंदी सारेगमपचा महासंग्रामही त्यांनी जिंकला. 'बाजीराव मस्तानी' या सिनेमातील 'पिंगा', 'कलंक' या सिनेमातील 'घर मोरे परदेसिया' अशी काही सुप्रसिद्ध गाणी त्यांनी गायली आहेत.

Vaishali Made

याशिवाय अलिकडेच वैशाली यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काही ज्येष्ठ नेत्यांनी वैशाली यांचे पक्षात स्वागत केले होते. यावेळी वैशाली माडे यांना विदर्भाचे विभागीय अध्यक्षपद देण्यात आले आहे. आता आजच्या त्यांच्या जिवाला धोका असल्याच्या फेसबूक पोस्टनंतर त्या चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT