NCP leader Sumed shyamkunvar
NCP leader Sumed shyamkunvar 
विदर्भ

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाप्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्यावर गुन्हा दाखल

सरकारनामा ब्युरो

अभिजीत घोडमारे

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे दिसत आहे. मोहाडीचे राष्ट्रवादीचे आमदार राजू कोरमारे (Raju koremare) यांच्या प्रकरणाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. हे प्रकरण ताजे असतानाच आता भंडारा अर्बन को-आप बॅंक लिमिटेडच्या विद्यमान उपाध्यक्षावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे भंडाऱ्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली होती. ही प्रकरणे काहीशी शांत होत असताना आता पुन्हा एकदा एका राष्ट्रवादीच्या नेत्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. (Bhandara Crime news)

भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव पोलिस ठाण्यात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुमेद श्यामकुंवर (Sumed shyamkunvar) यांच्यावर अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या 10 वर्षा पासून ते राष्ट्रवादी पक्षासाठी काम करत आहे. नुकत्याच झालेल्या भंडारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीकडून सावरी ठाणा जिल्हा परिषद क्षेत्रासाठी निवडणूकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा शहरातील एका गर्ल्स हॉस्टेलमध्ये पिडीत मुलगी शिक्षणासाठी याच राहत होती. तर राष्ट्रवादीचे नेते सुमेद श्यामकुंवर हे या हॉस्टेलचे संचालक आहेत. 25 फेब्रुवारीला सायंकाळी सुमेद श्यामकुंवर यांनी पिडीत मुलीच्या वडीलांना कॉल करत आपण त्यांच्या मुलीला हॉस्टेलवर घेऊन जाण्यासाठी आलो असल्याचे सांगत तिला आपण उभे असलेल्या ठिकाणी पोहचवण्याास सांगितले. स्वत: हॉस्टेलच्या संचालकांनी कॉल केल्यामुळे पिडीत मुलीच्या वडीलांनी विश्वासाने तिला संचालकांसोबत हॉस्टेलवर जाण्यासाठी सोडले.

संचालक श्यामकुंवर यांनी आपल्या चारचाकीतून हॉस्टेलवर आणत असताना वाटेत एका निर्जन स्थळी गाड़ी थांबवत पीडीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. त्यानंतर पिडीता हॉस्टेलवर पोहचताच तिने सर्व हकीकत आपल्या मैत्रीणीला सांगितली. तिच्या मैत्रीणीने पीडितेच्या वडीलांना फोन करत सर्व घडलेली घटना सांगितली. त्यानंतर वडीलांनी जवळचे पोलिस स्टेशन गाठत आरोपी सुमेद श्यामकुंवर विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, नववर्षाच्या सुरुवातीला राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांनी आपल्या व्यापारी मित्राला पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा जाब विचारताना पोलिसांना अश्लील शिवीगाळ करण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या प्रकरणी भंडारा पोलिसांनी कारेमोरे यांना अटक केल्यावर न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना 12 तासाची तुरुंगाची शिक्षाही झाली होती.अखेर अंतरिम जामिनावर त्यांची तात्पुरती सुटका करण्यात आली.

हे प्रकरण ताजे असतानाच भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते ॲड.जयंत वैरागडे व त्यांच्या दोन्ही भावांवर जबलपूर महिला पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंद दाखल केल्याचे प्रकरणही ताजेच आहेत. असे असताना आता राष्ट्रवादीच्याच सुमेद श्यामकुवर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने पुन्हा एकदा भंडाऱ्यातील राष्ट्रवादीचे नेते चर्चेत आले आहेत. त्यामुळे नववर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात राष्ट्रवादी दोन मोठ्या नेत्यांवर आणि फेब्रुवारी महिन्यात पुन्हा मोठ्या नेत्यावर पोलिस कारवाईची ही प्रकरणे राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी अडचणीची ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT