Gulabrao Gawande
Gulabrao Gawande sarkarnama
विदर्भ

राष्ट्रवादीचे नेते माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांना दोन वर्षांची शिक्षा

सरकारनामा ब्यूरो

अकोला : पोलिस कर्मचाऱ्याशी वाद घालने माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे (Gulabrao Gawande) यांना चांगलेच महागात पडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांना शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा सुवावली आहे.

अकोल्यातील (Akola) अग्रसेन चौकात तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याशी वाद घालून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी, पोलीस कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून रामदास पेठ पोलिसांनी गावंडे यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील सुनावणीनंतर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. डी. गव्हाणे यांनी सबळ पुरावे व साक्षीदारांच्या आधारे गावंडे यांना कलम 353 अन्वये दोन वर्षांची शिक्षा, पाच हजार दंड व कलम 294 अन्वये 2000 रुपये दंड भरण्याचे आदेश दिले आहेत.

याप्रकरणातील इतर आरोपी असलेल्या तिघांना पुराव्याअभावी न्यायालयाने सुटका केली. सरकारतर्फे अॅड. दिपक गोटे यांनी काम पाहिले. त्यांना सिएमएस सेलचे राम पांडे व पोलिस ठाण्याचे बळीराम चतारे यांनी सहकार्य केले. गावंडे हे शिवसेनेकडून अकोट विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र, २०१४ च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी पुन्हा शिवसेनेतून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसची घड्याळ हातावर बांधली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT