NCP Merger News : शरद पवार यांची रुग्णालयात जाऊन प्रफुल्ल यांनी घेतलेली भेट, त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आज अजितदादा असते, तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र दिसल्या असत्या, अशी दिलेली प्रतिक्रिया, यावर पुन्हा एकदा राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांना फोडणी बसली आहे.
अजित पवार राष्ट्रवादीचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी यावर, फेब्रुवारी महिन्यामध्ये अजितदादा दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र करणार होते, त्यांनी मला ते सांगितले होते, असा दावा केला आहे.
शरद पवार (Sharad Pawar) यांची प्रफुल्ल पटेल यांनी भेट घेतल्यानंतर सुनील तटकरे यांच्या, अजितदादा असते, तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आज एकत्र दिसले असते. अजित पवार यांच्या निधनामुळे ही चर्चा मागे पडली. अजित पवार असते, तर विलिनीकरणाची 12 फेब्रुवारी तारीख जी सांगितली जाते ती निश्चित झाली असती, या विधानाला माजी आमदार अमोल मिटकरी यांनी फटकारले आहे.
सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना नऊ महिन्यानंतर साक्षात्कार कसा झाला? तुमची सात महिन्यामधील विधाने काढा, विलिनीकरणावर पडदा टाका तुम्हीच म्हटले होते. दादा गेले तो विषय संपलेला आहे, त्याविषयी कुठलीही चर्चा नाही, आम्ही जेव्हा विलनीकरणावर बोललो तर आम्हाला वेड्यात काढले होते. तुम्हाला बोलायचे असेल तर वैयक्तिक बोला, अशा विधानांची आठवण करत तटकरे यांना अप्रत्यक्षपणे मिटकरी यांनी फटकारले आहे.
अजितदादांनी शरद पवार साहेबांसोबत 23 बैठक घेतल्या होत्या, तेव्हा अजितदादा एकटे का होते? त्याचे उत्तर आता कळायला लागल आहे. त्यांचे आता आलेले विधान विचार करायला लावणार आहे, असेही गंभीर विधान पुढे अमोल मिटकरी यांनी केले. शरद पवारांना भेटायला जाणे काही गैर नाही. पण त्याचा व्हिडीओ कोणी बनवला आणि तो मीडियात कोणी टाकला? तो व्हिडिओ काढायला पाहिजे नव्हता, आणि व्हायरल करायला पाहिजे नव्हता, असेही मत अमोल मिटकरी यांनी व्यक्त केले.
शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीचा व्हिडिओमध्ये दहा तारखेनंतर बैठक घेऊ असे म्हटले जात आहे. याचा धागा पकडत, अमोल मिटकरी यांनी आमदार रोहित पवार दहा तारखेला अजित पवार यांच्या अपघाताबाबत प्रेस घेणार आहेत. त्यात एका मफलरवाल्या व्यक्तीचं नाव जाहीर करण्याचे कळत आहे. त्यापार्श्वभूमीवर दिवाळीनंतर या घडामोडी होत असतील, तर काल आमच्या नेत्याने शरद पवार साहेबांची घेतलेली भेट कौटुंबिक होते, असे मानतो तर व्हिडीओ व्हायरल करायची आवश्यकता काय होती, असा प्रश्न अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत. राष्ट्रीय नेत्या आहेत. त्यांचे नेतृत्व आम्ही मानतो. त्यांनी काय भूमिका घ्यावी, हे त्यांनी ठरवावे आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. दोन्ही पक्ष एकत्र आले, तर सत्ते सोबत राहायचं की सत्तेच्या बाहेर जायचं, हे सुनेत्रा वहिनी ठरवतील, ते जसे ठरवतील ते आम्हाला मान्य राहील, असे मोठे विधान अमोल मिटकरी यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.