Amol Mitkari, Ashish Shelar Sarkarnama
विदर्भ

Amol Mitkari : "सोलून काढण्याची भाषा कोणी करू नये..."; शेलारांच्या 'त्या' वक्तव्यावर मिटकरींचा आक्षेप, नेमकं काय म्हणाले?

Jagdish Patil

Nagpur News, 16 August : बांगलादेशात हिंदू समाजावर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आज नाशिक (Nashik) बंदची हाक दिली होती. मात्र या बंदला गालबोट लागलं, शहरातील काही भागात दगडफेकीच्या घटना घडल्या. दोन जमाव एकमेकांसमोर आल्याने ही दगडफेक झाली यावेळी जमावाकडून वाहनांची तोडफोड देखील करण्यात आली.

या राड्यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या सर्व प्रकरणावर बोलताना भाजपचे नेते आशिष शेलार यांनी 'हिंदू मोर्चाला विरोध करणाऱ्यांच्या पाठी सोलून काढा', असं वक्तव्य केलं होतं. मात्र, आता त्यांच्या या वक्तव्यावर महायुतीतील मित्रपक्ष असणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी आक्षेप घेत शेलारांना सल्ला दिला आहे.

मिटकरी म्हणाले, "पुरोगामी महाराष्ट्रात अशा पद्धतीचे मोर्चे निघणे योग्य नाही. देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करताना आपण हिंदु-मुस्लिम एक आहोत, असं म्हणतो. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्रात अशा प्रकारचे राडे होणे शोभणारे नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) या प्रकरणाची दखल घेत कारवाई करावी. कुणीतरी चिथावणी दिल्यामुळे समाजात तेढ निर्माण होतोय.

राष्ट्रवादी पक्ष हा सेक्युलर विचारधारेचा असून असं कृत्य होताना महायुतीमध्ये सोलून काढण्याची भाषा कोणी करू नये. आशिष शेलार नेमकं कशावर बोलले हे माहिती नाही पण त्यांनी असं बोलणं टाळावं." दरम्यान मिटकरी यांनी संजय राऊतांनी अजित पवारांवर (Ajit Pawar) केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.

ज्या व्यक्तीचा घसा दुसऱ्यावर तोंडसुख घेण्यासाठी वळवळत असतो, त्या माणसाच्या नरड्यातून सरडा हा शब्द येणं काही गैर वाटत नाही. अजित पवारांबद्दल बोलत असतील तर तोंडाचा पट्टा चालवणाऱ्यांचा बंदोबस्त राष्ट्रवादीला करता येतो, असा इशारा त्यांनी राऊतांना दिला.तसंच, दुतोंडी सापाने ठाकरे आणि पवार कुटुंब फोडलं त्यांनी सुप्रिया सुळे आणि अजितदादा या बहीण भावाच्या नात्यावर बोलूच नये.

एक दिवस ते उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपवल्या शिवाय राहणार नाहीत. संजय राऊत निवडून आल्यावर त्यांनी गुलाल उधळला असेल. हिंदू धर्मात गुलाबी हा पूजनीय रंग आहे. तिकडे हिंदुत्वाचा उर बडवायचा आणि दुसरीकडे त्या रंगावर टीका करायची. महाविकास आघाडीचा पराभव होताना दिसत असल्यामुळे ते आपल्या तोंडाचा पट्टा चालवत आहेत, अशा शब्दात त्यांनी राऊतांवर हल्लाबोल केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT