T Raja Singh, Amol Mitkari Sarkarnama
विदर्भ

Amol Mitkari On T Raja Singh : टी. राजा यांच्या 'हिंदू राष्ट्रा'च्या वक्तव्यावर मिटकरींचा पलटवार; म्हणाले, 500 पार गेला तरी...

Jagdish Patil

Amol Mitkari On T Raja Singh : लोकसभा निवडणुकीत भाजप 'चारसो पार पार' गेला असता तर भारत हिंदू राष्ट्र झालं असतं, असं वक्तव्य भाजप आमदार टी. राजा सिंह यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी यांनी टी. राजा यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. 400 नव्हे तुम्ही 500 पार जरी केलं असतं, तरी हे हिंदू राष्ट्र झालं नसतं असं मिटकरी यांनी म्हटलं आहे.

भिवंडी तालुक्यातील पडघा येथे संत संमेलन व हिंदू धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेस मुख्य मार्गदर्शक म्हणून भाजप आमदार टी राजा सिंह हे उपस्थित होते. या सभेत बोलताना टी. राजा यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली. महाराष्ट्रात लव्ह जिहाद, गो हत्या ,धर्मांतर बंदी याबाबत कायदा का होत नाही? हिंदू एक झाला नाही तर भारत कधीच हिंदू राष्ट्र होणार नाही. राज्याचे हिंदुत्ववादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना कोणाची भीती आहे? असा सवालही त्यांनी या सभेत उपस्थित केला.

ते म्हणाले, "हिंदू एकत्र आले तर भारत हिंदू राष्ट्र बनेल. परंतु आता आपण आपल्या भारताला हिंदू राष्ट्र घोषित करू शकू असं वाटत नाही. ही धर्मसभा असली, तरीही निवडणुकीच्या दृष्टीनेही आपण याकडे पाहिलं पाहिजे. हिंदू कशाप्रकारे विभागले गेलेत आणि लव जिहादी कसे एकत्र आले आहेत. राजकारणावर मला बोलायचं नाही, पण राजकारणी नेत्यांशिवाय हिंदू राष्ट्र घोषित होऊ शकत नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जर भाजप 400 पार गेले असते तर भारत हिंदू राष्ट्र झालं असतं."

अमोल मिटकरी नेमकं काय म्हणाले?

अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) टी. राजा सिंह यांच्यावर पलटवार केला. ते म्हणाले, "टी राजा या एका व्यक्तीने 400 पार गेलो असतो तर हे हिंदूराष्ट्र झालं असतं, असा अजब दावा केला आहे. कदाचित टी. राजाला हे माहिती नसावं की, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला संविधान दिलं. या संविधानाच्या चौकटीत राहून या देशाचं नाव भारत म्हणजे स्वतंत्र भारत राष्ट्र हेच नाव देण्यात आलं आहे. 400 पार नव्हे तर तुम्ही 500 पार जरी गेला असता, तरी या देशाला हिंदू राष्ट्र किंवा इस्लाम राष्ट्र कोणीही घोषित करू शकत नाही."

दरम्यान, आमदार मिटकरी यांनी याच संदर्भात एक पोस्ट एक्सवर शेअर केली आहे. ज्यामध्ये लिहिलं आहे की, "टी. राजा ला या देशात लोकशाही नांदते व या देशाला संविधान आहे हे कदाचित माहीत नसावं! हा अखंड भारत आहे व तो अखंड भारत राहील! "ग्लानिर्भवती " "भारत" हा कृष्णाचा उपदेशसुद्धा टी राजा विसरला असावा." अशा शब्दात मिटकरी यांनी टी. राजा सिंह यांच्यावर निशाणा साधला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT