MLA Saroj Ahire
MLA Saroj Ahire Sarkarnama
विदर्भ

Saroj Ahire: सावरकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी राष्ट्रवादीच्या आमदार आग्रही : शिंदे-फडणवीसांना घातले साकडे

सरकारनामा ब्यूरो

Saroj Ahire : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यांनी विधानसभा अधिवेशन स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मगाव असणाऱ्या भगूरमध्ये सावरकरांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक तयार करण्यासाठी शंभर  कोटी रुपयांची तरतूद करावी अशी मागणी शिंदे- फडणवीस सरकारकडे केली आहे.

 “स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मभूमी असलेले भगूर गाव माझ्या मतदारसंघात येते, याचा अभिमान वाटत असल्याचे सांगून. सावरकरांचा जाज्वल्य इतिहास आंतरराष्ट्रीय पातळीवर जनतेसमोर येण्यासाठी त्यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक भगूर गावात उभे राहिले पाहिजे. त्याचबरोबर भगूर गावामध्ये स्मारक उभे राहिल्यास गावातील तरूणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील. त्यामुळे राज्य शासनाने 100 कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी सरोज अहिरे यांनी पुरवणी मागण्यां दरम्यान विधानसभेत झालेल्या चर्चेत केली.

भगूर गावातून वाहणाऱ्या दारणा नदीमध्ये जे दूषित पाणी मिश्रीत होत आहे. त्यामुळे शेती आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे. त्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी जो ‘एसटीपी’ प्रकल्पाचा प्रस्ताव मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी केली.

स्वातंत्र्यवीर सावरकरांसंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने काही ना काही टीका करत असतात तर शिवसेना आणि भाजपचे आमदार सावरकरांच्या समर्थनासाठी आग्रही असतात. परंतु, नाशिकच्या देवळालीच्या राष्ट्रवादीच्या आमदार असलेल्या सरोज अहिरे यांनी भगूर मध्ये सावरकरांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक तयार करण्यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी करण्याला वेगळे राजकीय महत्त्व निर्माण झाले आहे.

काही दिवसांपूर्वी सरोज अहिरे आपल्या तान्ह्या बाळाला घेऊन अधिवेशनाला हजर राहण्यासाठी नागपूरला पोहोचल्या. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. “आपल्या लहान बाळाचे संगोपन करताना सरोज अहिरे यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक कर्तव्याला विसरला नाहीत, याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले होते”. नागपूर विधानभवनात त्यांच्यासाठी खास हिरकणी कक्ष सुरू केला. त्याचे उद्घाटन देखील सरोज अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT