Ajit Pawar's Statement on Lok sabha Election : लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तम करणाऱ्यांना विधानसभेची उमेदवारी दिली जाईल, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले असून नव्या चेहऱ्यांचा विचार करीत असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. (He also said that he is thinking of new faces)
विरोधी पक्षनेते अजित पवार नुकत्याच नागपुरात झालेल्या ओबीसी शिबिरासाठी आले असता माध्यमांसोबत बोलत होते. प्रथम लोकसभा निवडणूक आहे, त्यानंतर विधानसभा. लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही चाचपणी करत आहोत. नवीन चेहऱ्यांचा विचार केला जात आहे. नवीन चेहरे पुढे येत आहे का, महिलांमधून कुणी पुढे येऊ शकते का, याबाबत विचार विमर्श सुरू असल्याचे ते म्हणाले.
मुंबईमध्येसुद्धा इतर जागांसाठी चर्चा करणार आहे. लोकसभेमध्ये चांगले काम करेल, निकाल चांगला देईल, त्याचा आमदारकीसाठी विचार करू. त्यासाठी इच्छुकांनी अधिक मेहनत घेऊन काम करणे गरजेचे आहे. जो अधिकाधिक लोकांमध्ये राहून काम करेल, त्याला प्रतिसाद नक्कीच मिळेल आणि अशांचाच विचार करण्यात येईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
सत्तेच्या फॉर्म्यूल्याबाबत ते म्हणाले, २००४ सालचा अपवाद वगळता ज्याचे जास्त आमदार त्याचाच मुख्यमंत्री (Chief Minister) असतो, त्या घटनेला आता १९ वर्षे झालेली आहेत. त्यावेळी जागा जास्त आल्यावरसुद्धा आम्ही मुख्यमंत्रिपद न घेता, चार मंत्रिपद अधिक घेतले होते, असे ते म्हणाले.
संजय राऊतांसोबत वाद नाही..
संजय राऊत (Sanjay Raut) त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते आहेत. त्यांनी काय बोलावे, हा त्यांचा विषय आहे. परंतु आमच्यात कुठलाही वाद नाही. ते मोठे नेते आहेत, असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. ते काही बोलले तर मला वाईट वाटत नाही, तुम्हाला का वाईट वाटते, तुम्ही काळजी करू नका, असे मी कार्यकर्त्यांना समजावून सांगतो, असेही त्यांनी नमूद केले.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.