Nilesh Rane and Baba Gujar Sarkarnama
विदर्भ

NCP News : निलेश राणेंच्या कानाखाली कोण वाजवणार? राष्ट्रवादीचे 'हे' नेते एक लाख रुपये...

सरकारनामा ब्यूरो

NCP will give one lakh rupees : निवडणुका आल्या की शरद पवार मुस्लिमांना जवळ करतात, ते औरंगजेबाचा पुनर्जन्म आहेत, अशी जहरी टिका भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी केली. त्यानंतर राज्यभरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते खवळले आहेत. ठिकठिकाणी निलेश राणेंचा विरोध केला जात आहे. (Nilesh Rane is being opposed everywhere)

माजी खासदार निलेश राणे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विरोधात ट्विटरवर अपशब्द वापरून ट्विट केले आहे. या निलेश राणेंच्या या वक्तव्याचा महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे. नागपूर जिल्ह्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष या नात्याने शरद पवार यांच्या विरोधात केलेल्या विधानाचा निषेध करतो, असे बाबा गुजर यांनी सांगितले.

मिळेल तिथे निलेश राणेच्या कानाखाली जो वाजवेल, त्याला एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. राणे परिवारातील वाचाळवीरांना, त्यांच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी लवकरच लगाम घालावा. अगोदरच राज्यातील परिस्थिती ठीक नाही. जातीय दंगलसदृश वातावरण आहे. असे असताना असताना जबाबदार व्यक्तींनी असे विधान करणे अतिशय चुकीचे आहे, असेही शिवराज ऊर्फ बाबा गुजर म्हणाले.

आगीत तेल ओतण्याचे काम वरिष्ठ नेते करीत आहेत. जनतेला शांततेचे आवाहन करण्याचं सोडून मीडियावर एक दुसऱ्यावर आरोप करण्याची स्पर्धा सुरू आहे. आमच्या वरिष्ठ नेत्यांचा अपमान यापुढे सहन केला जाणार नाही याची दखल राणे कुटुंबीयांनी घ्यावी, असा इशाराही बाबा गुजर यांनी दिला आहे.

मागील वर्षीही केली होती टिका..

मागील वर्षीही निलेश राणेंनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता. निलेश राणे यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर तेव्हा आरोप केले होते. शरद पवार हे गंभीर विषयावर बोलत नाहीत. नवाब मलिक यांच्यासाठी राष्ट्रवादी रस्त्यावर उतरते. नवाब मलिकांचे हे प्रकरण गंभीर आहे. देशाच्या संरक्षणासाठी हे प्रकरण धोकादायक आहे.

मलिक यांचा राजीनामा राष्ट्रवादीने (NCP) घ्यायला पाहिजे, पण पवार (Sharad Pawar) साहेबांनी अशा लोकांना पक्षात ठेवता कामा नये, असं सांगत निलेश राणे (Nilesh Rane) यांनी पवारांवर हल्लाबोल केला होता. दाऊदचा माणूस पवार यांना चालतो, युक्रेनसाठी भाजपच्या नेत्यांना फोन लावता, पण यावर काही बोलत नाही असा टोलाही मागील वर्षी निलेश राणे यांनी पवारांना लगावला होता.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT