Fetari Gram Panchayat Election
Fetari Gram Panchayat Election Sarkarnama
विदर्भ

मोठी बातमी : बालेकिल्ल्यातच फडणवीसांना झटका; दत्तक घेतलेल्या गावात राष्ट्रवादीची सत्ता

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना नागपूर (Nagpur) जिल्ह्यातच मोठा धक्का बसला आहे. विकासासाठी दत्तक घेतलेल्या फेटरी या गावावर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) सत्ता मिळविली आहे. सरपंचही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच निवडून आला आहे. (NCP rule over Fetari Gram Panchayat)

फेटरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे रवींद्र खांबलकर हे विजयी झाले आहेत. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमदेवाराचा पराभव केला आहे. विदर्भ हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला समजला जातो. त्यातही नागपूर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचा गड आहे. खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही नागापूरमधून निवडून येतात. त्याच नागपूर जिल्ह्यातील फेटरी गावात राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळविला आहे.

फेटरी ग्रामपंचायतीसह सरपंचपदाच्या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. विशेषतः उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हे गाव दत्तक घेतले असल्याने राष्ट्रवादीने मिळविलेला विजय महत्वाचा ठरतो आहे. फडणवीस, गडकरी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेसुद्धा नागपूरमधील आहेत. सरपंचपदाच्या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागलेली असते. खुद्द फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या गावातच भाजपला हार पत्कारावी लागली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT