Ajit Pawar Sarakarnama
विदर्भ

Katol Assembly Constituency: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अजित पवारांची साथ सोडून, हाती घेणार 'तुतारी'

Ajit Pawar NCP News: काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे असतानाही अजित पवार यांनी या मतदारसंघावर दावा केला नाही, यामुळे झाले आहेत नाराज.

Rajesh Charpe

NCP News: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेलेले नेते अन् पदाधिकाऱ्यांपैकी काहीजण पुन्हा शरद पवारांकडे जाताना दिसत आहेत. तर या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्ष अधिकाधिक उमेदवार जिंकूण आण्याचे नियोजन करतानाही दिसत आहे.

आतापर्यंत अनेकजणांनी यु टर्न घेतलेला आहे आणि काहींना तर उमेदवारीसुद्धा देण्याचा शब्द देण्यात आला आहे. यात आता नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदारसंघाचे सतीश शिंदे यांची भर पडली आहे.

सतीश शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश(NCP) उपाध्यक्ष आहेत. नागपूरच्या जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आहेत. काटोल विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार दिवंगत सुनील शिंदे यांचे ते चिरंजीव आहेत. काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघातील सावरगाव परिसरात शिंदे कुटुंबीयांचे वर्चस्व आहे. सुनील शिंदे या मतदारसंघातून दोन वेळ निवडून आले होते. शरद पवार यांच्यासोत शिंदे यांचे कौटुंबिक संबध आहेत.

सतीश शिंदे जिल्हा परिषद सदस्य होते. नागपूर जिल्हा परिषदेचे कृषी सभापतीसुद्धा होते. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि शिंदे एकाच पक्षात असले तरी त्यांच्यात सुप्त राजकीय संघर्ष सुरू होता. त्यामुळे सतीश शिंदे यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता.

काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे असतानाही अजित पवार(Ajit Pawar) यांनी या मतदारसंघावर दावा केला नाही. ही बाब त्यांच्यासोबत असलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांना खटकत आहे. काहींनी उघडपणे नाराजीसुद्धा बोलून दाखवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा न्याय सन्मान यात्रेचा कार्यक्रम काटोल विधानसभा मतदारसंघात घेण्यात आला होता. अजित पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्यासह राष्ट्रवादीने सर्वच बडे नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते.

या कार्यक्रमाला चांगलीच गर्दी झाल्याने अजितदादा खुश झाले होते. यामुळे ते काटोल मतदारसंघावरचा दावा सोडणार नाही असेच सर्वांना वाटत होते. विशेष म्हणजे दुसऱ्याच दिवशी दादांनी काही इच्छुकांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यामुळे अनेकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. यात सतीश शिंदे यांचाही समावेश होता.

मात्र अजित पवार यांनी या मतदारसंघावर दावाच केला नाही. त्यामुळे अनेकजण नाराज झाले आहेत. सतीश शिंदे यांच्या रुपाने ती नाराजी उघड झाली आहे. नागपूर शहरातीलसुद्धा अनेक पदाधिकारी नाराज आहेत. शिंदे यांचा पक्ष प्रवेश झाला नसला तरी शरद पवार यांनी मतदारसंघात काम करण्याचे निर्देश त्यांना दिले असल्याचे समजते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT