Anil Deshmukh
Anil Deshmukh Sarkarnama
विदर्भ

Anil Deshmukh News: अनिल देशमुखांच्या स्वागताला गर्दी करणाऱ्यांची कार्यकारिणीच्या बैठकीला मात्र दांडी !

सरकारनामा ब्यूरो

Nagpur News : एकनाथ शिंदे यांना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर त्यांच्यासह भाजपचा आत्मविश्‍वास बळावला आहे. त्यानंतर शिंदे गटाने नागपुरात कार्यकर्त्यांची फळी मजबूत करण्याचे काम सुरू केले आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे गटानेही शिवसंवाद कार्यक्रम घेऊन शिवसैनिकांना धीर देण्याचे काम सुरू केले आहे. हाच प्रयत्न राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही सुरू केला आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख नागपुरात परतल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उत्साह संचारेल असे, त्यांच्या आगमनाच्या दिवशी वाटले होते. पण त्यांच्या आगमनाच्या वेळी प्रचंड गर्दी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांपैकी कार्यकारिणीच्या बैठकीला अनेकांनी दांडी मारली. ही नाराजी नेमकी कोणामुळे आणि कशामुळे यांचे आता पक्षाला चिंतन करावे लागणार आहे. त्याशिवाय आगामी निवडणुकांत राष्ट्रवादीचा जोर दिसणार नाही.

गुरुवारी शहर आणि ग्रामीण अशी संयुक्त कार्यकारिणीची बैठक अनिल देशमुख यांनी बोलावली होती. कार्यालयात जागा कमी पडू शकते असे वाटल्याने बैठक शंकरनगर चौकातील साई सभागृहात घेण्यात आली. मात्र या बैठकीला शंभरही पदाधिकारी आले नाहीत. विशेष म्हणजे शहरातील पदाधिकाऱ्यांची संख्या मोजकीच होती. बैठकीला माजी मंत्री रमेश बंग, शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे, ग्रामीणचे अध्यक्ष बाबा गुजर, अनिल अहीरकर, सुखदेव वंजारी आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

अडीच वर्षे राज्यात महाविकास आघाडीची सत्ता होती. काँग्रेस आणि शिवसेनेने आपल्या कार्यकर्त्यांना समित्यांवर नियुक्त करून त्यांना बळ दिले. मात्र राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपेक्षितच राहिले. तुम्ही अठरा महिने नव्हते. त्यावेळी मुंबई आणि पुण्यातून नेते यायचे. ते एका कानाने ऐकायचे आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचे अशी तक्रारवजा नाराजी अनिल देशमुख यांच्याकडे अनेकांनी व्यक्त केली.

महापालिका (Municipal Corporation) आणि नगर पालिकांच्या निवडणुका केव्हाही जाहीर होऊ शकतात. त्यामुळे आता फक्त आणि चर्चा करण्यात अर्थ नाही. त्यापेक्षा पक्षाचे (NCP) मेळावे घ्या. पक्षबांधणीवर खर्च करा असाही सल्ला काही पदाधिकाऱ्यांनी दिला. अनिल देशमुख यांना मानणारा मोठा वर्ग आहे. शहर आगमनाच्या वेळी उसळलेल्या गर्दीतून ते दिसून आले. त्यामुळे तुम्ही आता विदर्भाचे नेतृत्व हाती घ्या अशीही मागणी यावेळी अनिल देशमुख यांच्याकडे अनेकांनी केली.

अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. कुठलेही कारण आणि पुरावे नसताना भाजपने (BJP) दिलेला त्रास याची माहिती सर्वांना दिली. आता गटातटाचे राजकारण सोडण्याचा सल्ला देऊन एकजुटीने काम करण्याचे सर्वांना आवाहन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT