Nagpur News : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उमुख्यमंत्री अजित पवार उद्या बुधवारी विदर्भात येणार आहेत. त्यांनी नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीणच्या पदाधिकाऱ्यांना रविभवन येथील विजयगड बंगल्यावर सर्वांना भेटीसाठी बोलावले आहे. या दरम्यान ते झाडाझडती घेणार असल्याने अनेकजण धास्तीत आहे.
ग्रामीणच्या पदाधिकाऱ्यांना ते दुपारी चार ते पाच तर शहरातील पदाधिकाऱ्यांना सायंकाळी पाच ते सहा या वेळेत ते भेटणार आहे. तत्पूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघात धर्मराव बाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) यांच्या पुढाकाराने सुरू होणाऱ्या सूरजागड इस्पात प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला ते जाणार आहेत. परतीच्या प्रवासात नागपूरमध्ये ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत.
लोकसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर ते प्रथमच विदर्भात येत आहेत. विधान परिषदेसाठी विदर्भातून एक उमेदवाराला संधी देण्याची मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली होती. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत विरोधकांसोबत सामना करण्यासाठी विदर्भातील पदाधिकाऱ्यांना शासकीय समित्या, महामंडळे देण्याचीसुद्धा वारंवार मागणी होत आहे.
जिल्हा नियोजन समितीचा अपवाद वगळता अद्याप राष्ट्रवादीच्या (NCP) एकाही पदाधिकाऱ्याला मोठे पद देण्यात आले नाही. यावरून विदर्भातील पदाधिकाऱ्यांमध्ये धुसफूस सुरू आहे. विधानसभेत हिंगणा आणि काटोल-नरखेड तसेच शहरातून उत्तर आणि पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी सोडावा असाही आग्रह केला जात आहे. या सर्व मागण्या आणि राजकीय परिस्थितीची अजित पवार विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.