Mahavikas Aghadi and BJP
Mahavikas Aghadi and BJP Sarkarnama
विदर्भ

Vajramooth meeting News : परवानगी नाकारल्यास होईल नाचक्की, वज्रमूठ सभेचे स्थळ बदलणार ?

सरकारनामा ब्यूरो

Congress and BJP are currently clashing : छत्रपती संभाजी नगरची महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा प्रचंड यशस्वी झाल्यानंतर आता येत्या १६ तारखेला नागपुरात ही सभा घेण्यात येत आहे. पण सभास्थळावरून कॉंग्रेस आणि भाजपमध्ये सध्या जुंपली आहे. दर्शन कॉलनीतील मैदानाची परवानगी ऐनवेळी नासुप्रने नाकारल्यास नाचक्की होऊ शकते, म्हणून वज्रमूठ सभेचे स्थळ बदलवण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. (Movements are underway to change the venue of the meeting)

भाजप आणि खेळाडूंचा विरोध आणि पार्किंगच्या अडचणी लक्षात घेऊन महाविकास आघाडी सभेसाठी दर्शन कॉलनीतील क्रीडांगणाचा हट्‍ट सोडणार असल्याची माहिती आहे. येथून जवळच असलेल्या एन. कुमार यांच्या मोकळ्या जागेत सभा घेण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

दोनच दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या नियोजन बैठकीत वज्रमूठ सभा ही दर्शन कॉलनीत पटांगणावरच घेण्याचा निर्धार नेत्यांनी केला होता. या सभेला उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित राहणार आहेत. आघाडीच्या नागपूरच्या सभेची जबाबदारी काँग्रेसवर सोपवण्यात आली आहे.

माजी मंत्री सुनील केदार यांना या सभेचे समन्वयक म्हणून नेमले आहे. सभा भरगच्च करण्यासाठी जोरदार तयारी काँग्रेसच्यावतीने केली आहे. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्या नेतृत्वात रविवारी दर्शन कॉलनीतील पटांगणाची पाहणी करण्यात आली. पूर्व विदर्भातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांना सभेसाठी आणले जाणार आहे. त्यामुळे सभेला प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. दर्शन कॉलनीतील पटांगणाच्या सभोवताल दाट वस्ती आहे आणि रस्ते फारच अरुंद आहेत. हे बघता सभा स्थळ बदलवणेच योग्य असल्याचे मत काँग्रेसच्या नेत्यांचे झाले आहे.

सभास्थळाची साफसफाई सुरू..

दर्शन कॉलनीपासून जवळच असलेल्या एन. कुमार यांच्या मोकळ्या जागेची साफसफाई केली जात आहे. येथे पूर्वी पार्किंगची व्यवस्था केली जाणार होती. मात्र येथेच सभा घेण्याचे आता ठरवले जात आहे. नागपूर (Nagpur) सुधार प्रन्यासने ऐनवेळी परवानगी रद्द केल्याने नाचक्की होऊ नये, याची खबरदारी घेतली जात असल्याचे कळते. दुसरीकडे स्थानिक लोकांचा या सभेला विरोध आहे.

अलीकडेच विकसित करण्यात आलेले पटांगण यामुळे खराब होईल, त्यामुळे सभेच्या विरोधात आंदोलन केले जात आहे. मात्र हे आंदोलन भाजप (BJP) पुरस्कृत असल्याचे काँग्रेस (Congress) नेत्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे सभेच्या स्थळावरून मतभेद असतील चक ते बदलवले जाईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT